​VALENTINE DAY SPECIAL : प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असत...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2017 11:18 AM2017-02-12T11:18:11+5:302017-02-12T16:52:43+5:30

फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हटले जाते कारण प्रेमवीरांचा उत्सव ‘व्हॅलेंटाइन डे’ याच महिन्यात १४ फेबु्रवारीला संपूर्ण जगात साजरा केला जातो.

VALENTINE DAY SPECIAL: Love means, love means, love ...! | ​VALENTINE DAY SPECIAL : प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असत...!

​VALENTINE DAY SPECIAL : प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असत...!

Next
ong>-Ravindra More

फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हटले जाते कारण प्रेमवीरांचा उत्सव ‘व्हॅलेंटाइन डे’ याच महिन्यात १४ फेबु्रवारीला संपूर्ण जगात साजरा केला जातो. प्रेमी या दिवसाची तयारी मोठ्या उत्साहात करीत असतात. कारण याच दिवशी दोन्ही प्रेम करणारे आपले प्रेम व्यक्त करतात. मात्र काही जणांचे प्रेम स्वीकारले जाते तर काहींचे नाकारले जाते.



* काय आहे प्रेमाची परिभाषा
खरे प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही आणि त्याची तशी कोणतीच परिभाषाही नाही. प्रेमाची फक्त जाणिव केली जाऊ शकते. हा एक असा सुंदर आभास आहे जो दोन लोकांना अतुट नात्यात बांधत असतो. हे एक असे नाते आहे जे अंतकरणापासून जपले जाते. प्रेम कुणावरही सहज होऊ शकते मात्र सहज लुप्त होऊ शकत नाही. प्रेमाची त्याच व्यक्तिला जाणिव असते जो खऱ्या मनाने कुणावर तरी प्रेम करीत असेल. प्रेमाची कोणतीच भाषा नसते. ते शब्दविहीन असते. प्रेमाला फक्त मनाचा आवाज ऐकू  येतो. ह्रदयाच्या ठोक्यांची स्पंदने समजतात. प्रेम एक समर्पण आहे ज्याने मनुष्य संपूर्णपणे समर्पित होतो, प्रेम असे त्याग आहे ज्यामुळे मनुष्य जगातली सर्व संपत्तीला ठोकर मारु शकतो, प्रेम अशी तपस्या आहे ज्यात मनुष्य आपले सर्व सुख, सर्व ऐषोआराम आपल्या प्रेमासाठी बलीदान करतो. प्रेमात अशी ताकद असते की जेव्हा कुणावर प्रेम होते तर प्रेम मिळविण्यासाठी तो सातसमुद्र पार करुन येतो, प्रेमात ती ताकद आहे की सर्व बंधने तोडून प्रेमासाठी सर्व जगाशी लढू शकतो. 
प्रेमाची व्याप्ती खूप मोठी आहे. प्रेम फक्त प्रेमी-प्रेमिकापर्यंत मर्यादित नाही. प्रेम कुणावरही होऊ शकते, त्यात वयाचेही बंधन नसते, खरे प्रेम धर्म, जात, रंग, रुप, गरीब, श्रीमंत या गोष्टींना कधीही महत्त्व देत नाही, प्रेम हे फक्त प्रेम आहे. प्रेम मनुष्याच्या विचारसरणीला सकारात्मक बनवते. प्रेमात मनुष्य सहज आनंदी होतो, कुणाशी न बोलता सहज हसतो. प्रेम मनुष्याला जिंदादिल बनविते. प्रेम मनुष्याला जिवन जगण्याची कला शिकविते. प्रेमात ती ताकद असते ज्याने शत्रुही मित्र बनतो. मनुष्याजवळ कितीही संपत्ती असो, मात्र ज्याच्याजवळ खरे प्रेम नसेल तो कधीच आनंदी राहू शकत नाही. 

* खरे प्रेम
खरे प्रेम कधीही कुणाला पाहिल्यावर होत नाही. खरे प्रेम तर एकमेकांना ओळखून आणि समजून होत असते. खऱ्या प्रेमात कोणतीच घाई नसते. यात तर दोघांचा समजुतदारपणा असतो, एकमेकांवरचा विश्वास असतो, एकमेकांविषयी आदर असतो, एकमेकांची जाणिव असते. खरे प्रेम फक्त एकाशीच होत असते आणि ते निरंतर असते. ते कधीही लोप पावत नाही कारण ते एकमेकांना समजून होत असते. खऱ्या प्रेमात लोक एकमेकांच्या मनापासून जुळलेले असतात, खऱ्या प्रेमात प्रतिबद्धता असते, जबाबदारीची जाणिव असते. खरे प्रेम करणारे जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू देत, मात्र ते मनाने, ह्रदयाने, आत्म्याने कायम जवळ असतात, एक मेकांसोबत असतात, एकमेकांशी जुळलेले असतात. खरे प्रेम रंग, रुप, सौंदर्य, कामवासना यापासून खूपच लांब असते. हे ते दोन आत्म्यांचे मिलन असते. खरे प्रेम कधी हार मानत नाही. जर त्याला त्याचे उद्दिष्ट नाही मिळाले तरी ते लोप पावत नाही, नष्ट होत नाही, मात्र चिरकाल टिकते. खºया प्रेमात एकमेकांच्या सुखाची काळजी घेतली जाते, सुखदु:ख आणि कठीण प्रसंगात कायम सोबत असतात आणि हेच नाते आयुष्यभर टिकविले जाते. जेव्हा एखाद्याला खरे प्रेम होते तेव्हा त्यांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांचे स्वप्ने एक होतात.  

* प्रेम आणि आकर्षणात फरक 
आकर्षण (अस्थायी प्रेम) - यात पहिल्या नजरेत एखाद्याचा चेहरा आवडतो, कुणाचे डोळे आवडतात, कुणाची गप्पा करण्याची स्टाइल  आवडते किंवा एखाद्याचा व्यवहार आवडतो. याला पहिल्या नजरेचे प्रेम म्हणतात. शाळा, कॉलेजच्या दिवसात किंवा कमी वयात होणारे प्रेम हे आकर्षण असते ज्यात भावना तर प्रेमाच्याच असतात मात्र वय कमी असल्याने प्रेम व्यक्त करायला भीती वाटते. शिवाय जेव्हा आपल्या प्रेमाचा वेग खूप जलदगतीने वाढत असेल तर समजायचे की हे खरे प्रेम नसून एक आकर्षण आहे. आकर्षणाचे प्रेम लवकर सुरू होते आणि लवकर बरच काही मिळविण्याच्या प्रयत्नात लवकरदेखील लोप पावते. कधी कधी आकर्षण फक्त कामवासनासाठीदेखील असते, शिवाय त्यात फक्त देखाव्याचे प्रेम असते आणि ही आकर्षणता फक्त एकाशीच नसून ती बऱ्याचजणांकडून असते, असे प्रेम फक्त स्वार्थासाठी असते.  

Also Read : ​प्रेमात गुलाबाचे महत्त्व वेगळेच!

Web Title: VALENTINE DAY SPECIAL: Love means, love means, love ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.