75 हजार सीडींचा वापर करुन साकारली शिवरायांची प्रतिकृती
By Admin | Updated: May 6, 2017 18:45 IST2017-05-06T17:40:45+5:302017-05-06T18:45:45+5:30
तब्बल 75 हजार गाण्याच्या सिडींचा वापर करुन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे

75 हजार सीडींचा वापर करुन साकारली शिवरायांची प्रतिकृती
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य भल्या मोठ्या रांगोळ्या आपण आजवर पाहिल्या असतील. पण सीडींचा वापर करुन तयार केलेली शिवाजी महाराजांची प्रतिकृती कधी पाहिली आहे का? नक्कीच नसणार. पण मुंबईतल्या विक्रोळी परिसरात शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याने हा पराक्रम केला आहे. तब्बल 75 हजार गाण्याच्या सिडींचा वापर करुन त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली आहे.
चेतन राऊत असं या तरुणाचं नाव आहे. विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये तो राहतो. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून त्यानं ही शिवाजी महाराजांची ही अनोखी कलाकृती साकारण्यास सुरुवात केली. तब्बल 48 तासानंतर त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती पूर्ण केली.
चेतन राऊत जे जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आहे. दरम्यान सीडी पासून तयार करण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रस्ताव पाठण्यात आला आहे.