​जीआयएफ फाईल बनविण्यासाठी वापरा हे अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 18:16 IST2016-12-13T18:16:17+5:302016-12-13T18:16:17+5:30

आज प्रत्येकाच्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल साइटवर जीआयएफ फाईल पाहावयास मिळते. ही फाईल आता आपणासही एका अ‍ॅपच्या साह्याने निर्माण करता येऊ शकते.

Use this app to create a GIF file | ​जीआयएफ फाईल बनविण्यासाठी वापरा हे अ‍ॅप

​जीआयएफ फाईल बनविण्यासाठी वापरा हे अ‍ॅप

प्रत्येकाच्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल साइटवर जीआयएफ फाईल पाहावयास मिळते. ही फाईल आता आपणासही एका अ‍ॅपच्या साह्याने निर्माण करता येऊ शकते. जिफीकॅटने अँड्रॉईड प्रणालीसाठी अ‍ॅप सादर केले असून याच्या मदतीने कोणत्याही व्हिडीओजपासून जीआयएफ अ‍ॅनिमेटेड प्रतिमा तयार करु शकता.
 
जिफीकॅटने गुगल प्ले स्टोअरवर ‘जिफीकॅट लूप अ‍ॅप’ सादर केले आहे. हे मोफत अ‍ॅप असून कुणीही याच्या मदतीने कोणत्याही लूप व्हिडीओपासून जीआयएफ प्रतिमा तयार करू शकणार आहे. ही प्रतिमा कंपनीच्या क्लाऊड स्टोअरेजवर सेव्ह करण्यात येतील. तसेच या प्रतिमेला फेसबुक, ट्विटर, व्हाटसअ‍ॅप आदी सोशल साईटसह ई-मेलवरूनही शेअर करता येणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही जीआयएफ फाईलपेक्षा यात २० पटीने अधिक उत्तम रितीने प्रतिमा निर्मित होणार असल्याचा दावा जीफीकॅटने केला आहे.

Web Title: Use this app to create a GIF file

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.