सामान्यातील असामान्य रॉन कूपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 20:55 IST2016-05-07T15:25:13+5:302016-05-07T20:55:13+5:30

रॉनने एका मिनिटात सर्वाधिक पुश-अप आणि पुल-अप करण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केलेला आहे.

Unusual Ron Cooper of the ordinary | सामान्यातील असामान्य रॉन कूपर

सामान्यातील असामान्य रॉन कूपर

िनिज वर्ल्ड रेकॉर्ड’ घडविण्यासाठी तुमच्यामध्ये काही तरी वेगळे असणे अपेक्षित असते. जगावेगळे वैशिष्ट्य तुम्ही बाळगून असायला हवे.

मात्र, अमेरिकेच्या रॉन कूपरकडे पाहून कोणाचाच विश्वास बसणार नाही की या पठ्याच्या नावावर एकापेक्षा अधिक जागतिक विक्रमांची नोंद आहे.

रॉनने एका मिनिटात सर्वाधिक पुश-अप आणि पुल-अप करण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केलेला आहे. अंगावर 27 किलोचे वजन घेऊन त्याने एका मिनिटात 57 पुश-अप्स आणि तेवढ्या वेळेत 18 पुल अप मारण्याची असाधारण कामगीरी केली होती.

आता हे सांगितल्यावर तुमच्या मनात एकदम उंचपुरा, धष्टपुष्ट, बॉडीबिल्डर अशी रॉनची इमेज तयार झाली असेल. मात्र, तुम्ही त्याला पाहिले तर कळेल की, तो तुमच्या आमच्यासारखाच एकदम सामान्य आहे. अमेरिकेत पुरुषांची सरासरी उंची 5 फूट 10 इंच असते. रॉनदेखील 5’10’’ आहे. त्याचे वजन तर केवळ 75 किलो आहे. 

व्यावसायाने तो ‘फायनान्शिय प्लॅनर’ (आर्थिक नियोजक) असून पत्नी व दोन मुलींसह न्यू इंग्लंड शहरात राहतो. ‘द पुल-अप गाय’ म्हणून तो ओळखला जातो. मित्र त्याला रॉकी नावानेदेखील हाक मारतात. रेकॉर्ड बनविते वेळी त्याचे वजन 102 किलो होते.

Web Title: Unusual Ron Cooper of the ordinary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.