शेक्सपिअर समजून घेण्यासाठी ‘अॅप’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 18:25 IST2016-04-23T12:55:44+5:302016-04-23T18:25:44+5:30
अभिनेता इयान मॅक् केलन आणि दिग्दर्शक रिचर्ड लाँक्रेन यांनी हे अॅप लाँच केले.

शेक्सपिअर समजून घेण्यासाठी ‘अॅप’
स पूर्ण जगात शेक्सपिअरची 400वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचेनिमित्त साधून आयफोन यूजर्ससाठी एक खास अॅप बनविण्यात आले आहे, ज्याद्वारे सामान्य लोकांना शेक्सपिअर समजून घेता येणार आहे.
अभिनेता इयान मॅक् केलन आणि दिग्दर्शक रिचर्ड लाँक्रेन यांनी हे अॅप लाँच केले. या अॅपमध्ये कलाकार कोणतेही वेशभूषा न करता सामान्य कपड्यांत थेट कॅमेऱ्याकडे पाहून शेक्सपिअरचे ‘द टेम्पेस्ट’ नाटक वाचून दाखविणार आहेत.
इयानने सांगितले की, हा काही नाटकाचा प्रयोग नाही. आम्ही कलाकार केवळ यूजरसाठी ते वाचून दाखवितो. शेक्सपिअरची नाटके सामान्य वाचकांनी वाचावी म्हणून लिहिली गेलेली नाहीत. ती अॅक्टरने वाचून प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी बनलेली आहेत. तेच काम आम्ही या अॅपमधून करत आहोत. जेणे करून लोकांना ती अधिक चांगल्या प्रकारे समजावीत.
लवकरच शेक्सपिअरची सर्व 37 नाटके या अॅपमध्ये सामील करून घेण्यात येणार आहे. यूजरला नाटकाबद्दल अधिक नोट्सदेखील अॅपमध्ये वाचता येणार आहेत.