सेल्फीसाठी मोजा 2 हजार डॉलर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:29 IST2016-01-16T01:13:21+5:302016-02-13T04:29:32+5:30

खळबळजनक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पॉप गायक जस्टीन बिबरसोबत सेल्फी घ्यायची असल्यास आता चक्क 200...

Two thousand dollars for selfie! | सेल्फीसाठी मोजा 2 हजार डॉलर!

सेल्फीसाठी मोजा 2 हजार डॉलर!

बळजनक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पॉप गायक जस्टीन बिबरसोबत सेल्फी घ्यायची असल्यास आता चक्क 2000 अमेरिकी डॉलर मोजावे लागणार आहेत. पुढच्या वर्षींच्या जागतिक टूरसाठी त्याने ही योजना आखली आहे. वॉशिंग्टनमधील शीटल सिटीमध्ये तो 9 मार्चला जाणार आहे.

त्यासाठी त्याला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी यापुढे 2000 डॉलर मोजावे लागणार आहेत. मात्र, त्याच्या चाहत्यांनी या जस्टीनच्या योजनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी त्याला याबाबत ट्विटरवर देखील नाराजी नोंदविली असून, या प्रकाराचा निषेध केला आहे. दहा सेकंदासाठी आपण एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच्यासोबत सेल्फीच कशाला घेऊ अशा तीव्र प्रतिक्रियाही ट्विटरवरून नोंदविण्यात आल्या आहेत.

Web Title: Two thousand dollars for selfie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.