ट्विटर मोमेंट्स फिचर आता स्मार्टफोनवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 15:00 IST2016-12-03T15:00:49+5:302016-12-03T15:00:49+5:30
सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत असून, आपल्या युजर्सला नेहमी अपडेट ठेवण्यासाठी ट्विटरनेही पाऊल उचलले आहे.

ट्विटर मोमेंट्स फिचर आता स्मार्टफोनवर
स शल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत असून, आपल्या युजर्सला नेहमी अपडेट ठेवण्यासाठी ट्विटरनेही पाऊल उचलले आहे. काही महिन्यांपूर्वी ट्विटरने ‘मोमेंट्स’ हे फिचर वेबवरुन ट्विटरचा वापर करण्याऱ्यासाठी सादर केले होेते. मात्र आता हे फिचर स्मार्टफोनधारकांनाही प्रदान करण्यात आले आहे. ट्विटरने आपल्या युजर्ससाठी अपडेटच्या स्वरूपात याला देण्याची घोषणा केली आहे. अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी याला सादर करण्यात आले आहे. या सुविधेअंतर्गत कुणीही आपल्याला आवडणारे ट्विटस एकाच ठिकाणी संग्रहित करू शकतो.