​एक tweet आणि आनंद महिन्द्रा यांनी बंद केले ‘फाऊंटेन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 20:24 IST2016-03-31T03:24:42+5:302016-03-30T20:24:42+5:30

आनंद महिन्द्रा हे महिन्द्रा ग्रूपचे मॅनेजिंग डायरेक्टर. ‘महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे आणि तुमच्या आॅफिस बाहेर  फाऊंटेन  सुरु आहेत’ असे रोहित तळवळकर याचे tweet आनंद महिन्द्रा यांना मिळाले.

A Twitter and Ananda Mahindra closed the 'Fountain' | ​एक tweet आणि आनंद महिन्द्रा यांनी बंद केले ‘फाऊंटेन’

​एक tweet आणि आनंद महिन्द्रा यांनी बंद केले ‘फाऊंटेन’

आनंद महिन्द्रा हे महिन्द्रा ग्रूपचे मॅनेजिंग डायरेक्टर. ‘महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे आणि तुमच्या आॅफिस बाहेर  फाऊंटेन  सुरु आहेत’ असे रोहित तळवळकर याचे tweet आनंद महिन्द्रा यांना मिळाले. या tweetकडे आनंद महिन्द्रा दुर्लक्ष करू शकले असते. पण त्यांनी तात्काळ फाऊंटेन बंद करण्याचा निर्णय घेतला. या फाऊंटेनमुळे चुकीचा संदेश जात आहे, हे त्यांनी मान्य केले.
राहुल तळवळकर याने आनंद महिन्द्रा यांना टॅग करीत लिहिले होते, 
‘महाराष्ट्रात दुष्काळ असताना महिन्द्रा टॉवर्सवर फाऊंटेन सुरु आहेत. माझ्या मते हे अवॉइड केले जाऊ शकते.’  राहुलच्या या tweetवर महिन्द्रा ग्रुपने तात्काळ उत्तर दिले. फाऊंटेन पाण्याला रिसर्कुलेट करतात. त्यामुळे यामुळे पाण्याची नासाडी होत नाही. पण तुम्ही म्हणता, ते बरोबर आहे. यामुळे चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे आम्ही फाऊंटेन बंद करीत आहोत, असे महिन्द्रा ग्रूपने स्पष्ट केले. काही लोकांनी फाऊंटेन सुरु ठेवण्यास सपोर्ट केला. पण आनंद महिन्द्रा यांनी राहुलची बाजू उचलून धरली आणि त्याच्या मताचा आदर केला.

 

fountain at mahindra towers at time of severe drought in Mah. Guess can be avoided
 

Web Title: A Twitter and Ananda Mahindra closed the 'Fountain'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.