शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
3
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
4
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
5
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
6
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
7
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
8
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
9
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
10
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
11
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
12
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
13
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
14
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
15
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
16
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
17
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

Trend : ​घरीच बनवा ‘मुव्ही प्रोजेक्टर’ फक्त १०० रुपयात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 17:19 IST

प्रत्येकजण महागडा प्रोजेक्टर विकत घेऊ शकत नाही. जर आपणास प्रोजेक्टरवर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने...

-Ravindra Moreथिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद काही औरच असतो, मात्र प्रत्येकवेळी थिएटरमध्ये जाणे शक्य नसते. काहीजण प्रोजेक्टरच्या साह्यानेही घरी चित्रपट पाहण्याचा आनंद घेतात, मात्र प्रत्येकजण महागडा प्रोजेक्टर विकत घेऊ शकत नाही. जर आपणास प्रोजेक्टरवर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बुटांचे खोके आणि मॅग्नीफाइंग लेन्सच्या साह्याने मुव्ही प्रोजेक्टर बनवू शकता. विशेष म्हणजे हा प्रोजेक्टर आपल्या स्मार्टफोनवर काम करेल आणि खर्च येईल फक्त १०० रुपये. शिवाय  तयार होईल तोही १५ मिनिटात.कोणते साहित्य लागेल* एक मोकळे बुटांचे खोके (शू बॉक्स)* मॅग्नीफाइंग लेन्स* पेपर कटर* चिपकविण्यासाठी डिंक व टेप* थर्माकोलचा तुकडा* स्मार्टफोन (चित्रपटासाठी)नोट : मोबाइल मुव्ही प्रोजेक्टर बनविण्यासाठीचे साहित्य घरातच मिळेल. फक्त मॅग्नीफाइंग लेन्स मार्केटमधून खरेदी करावे लागेल. त्याची किंमत ५० रुपयापासून सुरू होते. एक चांगली मॅग्नीफाइंग लेन्स १०० रुपयात मिळू शकते. तशी लेन्स जेवढी मोठी आणि पॉवरफुल तेवढा प्रोजेक्टर चांगला काम करेल.मुव्ही प्रोजेक्टर बनविण्याची संपूर्ण प्रोसेस* मुव्ही प्रोजेक्टर बनविण्यासाठी सर्वप्रथम लेन्सचे हॅँडल पेपर कटर किंवा चाकूने कापून टाका.* लेन्सचे हॅँडल वेगळे झाल्यानंतर लेन्सला शू बॉक्सवर ठेऊन चारही बाजूने मार्क करा.* आता लेन्सला फिट करण्यासाठी बॉक्सवर मार्क केलेला गोल भाग कापा. * यानंतर बॉक्सच्या वरील कव्हरवरही लेन्स ठेऊन मार्क करा व तेवढा भाग कापा. * याप्रकारे बॉक्समध्ये लेन्सच्या आकाराचे होल निर्माण होतील.* बॉक्समध्ये लेन्स तयार झाल्यानंतर लेन्सला त्यात फिट करा आणि डिंकाच्या मदतीने चिपकवून घ्या. * डिंक वाळल्यानंतर बॉक्सच्या मध्ये स्मार्टफोन ठेवण्यासाठीचा स्टॅँड बनवावा. यासाठी थर्माकोलच्या तुकड्यांचा वापर करावा. * स्टॅँड बनविण्यासाठी सर्वप्रथम बॉक्सच्या मधल्या भागाचे मोजमाप करुन थर्माकोलचे दोन लांब तुकडे कापा. या दोन्ही तुकड्यांना अशाप्रकारे कापा की ते बॉक्समध्ये सहज हलविता येतील.  * यानंतर एका तुकड्याला दुसºया तुकड्यावर ९० अंशाने चिपकवा. याप्रकारे एक स्टॅँड बनेल. आता या स्टॅँडवर टेपच्या साह्याने स्मार्टफोनला फिट करा, मात्र स्क्रीनवर टेप होता कामा नये. * फोनची स्क्रीन लेन्सच्या बाजूने ठेवा. * आता स्मार्टफोनवर कोणत्याही चित्रपटाचा व्हिडीओ सुरू करा. जेव्हा आपण एखादा चित्रपट प्ले करता तेव्हा फोनचा डिस्प्ले रिजोल्यूशन १०० पर्यंत वाढवा. यामुळे चांगला व्हिडिओ आऊटपुट मिळेल. * चित्रपट अधिक चांगला दिसण्यासाठी व्हिडिओचा आऊटपुट एखाद्या पांढºया भिंतीवर घ्या. आपला स्मार्टफोन बॉक्समध्ये असल्याने साऊंडची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी आपण ब्लूटूथ स्पीकरचा वापर करू शकता. अशा पद्धतीने अतिशय कमी खर्चात आणि कमी वेळेत घरच्या घरी मुव्ही प्रोजेक्ट तयार होईल.