कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर औरंगाबाद शहरातील शिवछत्रपती महाविद्यालयात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत महाविद्यालयातील प्रशासकीय काम करणाºया कर्मचाऱ्यांसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षण शिबीर
r />यामध्ये कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.सोळूके यांच्या हस्ते होणार आहे. मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रीत करण्यात आलेले आहे. शुक्रवार पासून या शिबीराला प्रारंभ होत आहे. यामधे प्रत्येक दिवशी विविध क्षेत्रातील नामवंत प्रशासकीय व्यक्ती मागदर्शन करणार आहेत. सहा फेब्रुवारीला दुपारी चार वाजता या शिबीराचा समारोप प्राचार्य आर.टी.देशमुख यांच्या उपस्थिीतीत संपन्न होणार आहे. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी या शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.पी.व्ही.आष्टेकर यांनी केले आहे.