टॉम क्रूझची इंग्लंडमध्ये 7.4 दशलक्ष इस्टेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:48 IST2016-01-16T01:06:06+5:302016-02-05T07:48:18+5:30

'मिशन इमपॉसिबल'चा अभिनेता टॉम क्रूझच्या हॉलिवूडमधील ११.४ दशलक्ष मालमत्तेपैकी ७.४ दशलक्ष इस्टेट इंग्...

Tom Cruise's 7.4 million estate in England | टॉम क्रूझची इंग्लंडमध्ये 7.4 दशलक्ष इस्टेट

टॉम क्रूझची इंग्लंडमध्ये 7.4 दशलक्ष इस्टेट

'
;मिशन इमपॉसिबल'चा अभिनेता टॉम क्रूझच्या हॉलिवूडमधील ११.४ दशलक्ष मालमत्तेपैकी ७.४ दशलक्ष इस्टेट इंग्लंडमध्ये असल्याचे समोर आले आहे. डोरमन्स पार्क, इस्ट ग्रीनस्टीड यासाठी त्याने मोठा खर्च केला आहे. ११.३३१ चौरस फूटावर असलेल्या या घराला चार मजले असून, कर्मचार्‍यांसाठी राखीव जागा ठेवण्यात आली आहे. पाच-सहा बेडरुम्स आहेत. लंडनपासून ३0 मैलांच्या अंतरावर हे घर आहे. ब्रिटिश मुख्यालयाच्या चर्चजवळ हे घर क्रूझने बनवले आहे. १४.२ एकरमधील हे घर त्याने आणि त्याची आधीची पत्नी केटी होम्स हिने २00६ मध्ये ४.७५ दशलक्ष किंमत देऊन खरेदी केले आहे. टेरेसडवळ फ्रेंच दरवाजे असलेली एक वक्र बे विंडो आहे. यात व्हिक्टोरियन हवेली, चार रिसेप्शन खोल्या आणि एक ड्रेसिंग रूमचाही समावेश आहे. एक खाजगी बाल्कनी आणि एक मास्टर बेडरूम आहे. दोन लोक अंघोळ करू शकतील असा टब इथे तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या घरात एक डान्स स्टुडिओ, व्यायामसाठी खोली, स्क्रिनिंग खोली, आणि एक खोली खेळासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
 

Web Title: Tom Cruise's 7.4 million estate in England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.