3 हजार जोड्यांचा एकत्र विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 02:02 IST2016-02-21T09:02:11+5:302016-02-21T02:02:11+5:30

दक्षिण कोरियामध्ये पार पडलेला सामुदायिक विवाह सोहळ्यात 62 देशांतील तीन जोडप्यांनी एकत्र लग्नगाठ बांधली.

Together 3 thousand pairs together | 3 हजार जोड्यांचा एकत्र विवाह

3 हजार जोड्यांचा एकत्र विवाह

ऊथ कोरियामध्ये नुकतीच निराळी घटना पाहायला मिळाली. सामुदायिक विवाह सोहळे तसे नवीन नाहीत. मात्र, दक्षिण कोरियामध्ये पार पडलेला सामुदायिक विवाह सोहळा विशेष ठरला. कारण या सोहळ्यात 62 देशांतील तीन जोडप्यांनी एकत्र लग्नगाठ बांधली.

रेव्हरंड सुन म्युंग मून यांनी स्थापना केलेल्या युनिफि केशन चर्चतर्फे हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. सेऊलपासून 75 किमी दूर गॅप्येयाँग शहरामध्ये चर्चच्या चेआँगशिम पीस वर्ल्ड सेंटर येथे हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. तीन हजार जोडप्यां व्यतिरिक्त आणखी  जगभरातील 12 हजार जोडप्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून या सोळ्यात सहभाग नोंदविला, अशी माहिती दक्षिण कोरिया मुख्यालयाचे संचालक ऱ्यू क्येऊंग-सेउक यांनी दिली.

Rev. Sun Myung Moon

2012 साली मून यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. साठाव्या दशकापासून ते सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करत असत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी हाक जा हॅन मून यांनी सर्व विधी पार पाडले. यावेळी चर्चचे 22 हजार अनुयायी आणि पाहुणे उपस्थित होते.

या तीन हजारांपैकी एक हजार नवविवाहित जोडपी होती तर इतर दोन हजार जोडप्यांनी चर्च जॉईन करण्यापूर्वी लग्न केले होते म्हणून आशीर्वाद मिळविण्यासाठी पुन्हा लग्नविधी केला. इंग्लंडहून आलेला ह्यो-जू साँगने एका जपानी मुलीशी लग्न केले. तो म्हणतो, आम्ही एक वर्षांपासून एन्गेज्ड होतो. परतु एकमेकांपासून दूर राहायचो. अशा अविस्मरणीय पद्धतीने विवाह करून नेहमी सोबत राहणार यापेक्षा मोठा आनंद कोणता?

Web Title: Together 3 thousand pairs together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.