​टिंडर वि. थ्रीन्डर : टूसम कि थ्रीसम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 20:48 IST2016-05-26T15:16:59+5:302016-05-26T20:48:06+5:30

डेटिंग अ‍ॅप ‘टिंडर’ने स्पर्धक अ‍ॅप ‘थ्रीन्डर’ बंद पाडण्याचा निर्धार केला आहे.

Tinder v. Thrinder: The Tosम that Threesom? | ​टिंडर वि. थ्रीन्डर : टूसम कि थ्रीसम?

​टिंडर वि. थ्रीन्डर : टूसम कि थ्रीसम?

न व्यावसायिक कंपन्यांमध्ये स्पर्धा असणे स्वाभाविक आहे. परंतु म्हणून काय दुसऱ्याचा व्यावसायच ठप्प करून टाकायचा का असा प्रश्न सध्या टेक्नोजगतात विचारले आहे.

त्याचे निमित्त आहे ‘टिंडर’ वि. ‘थ्रीन्डर’ असा वाद. 

डेटिंग अ‍ॅप ‘टिंडर’ने स्पर्धक अ‍ॅप ‘थ्रीन्डर’ बंद पाडण्याचा निर्धार केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ‘टिंडर’ची लोकप्रियता खूप वाढली आहे. आपल्या आवडीनिवडीला अनुरुप जोडीदार शोधण्याची अनोखी सुविधा यामध्ये असते.

जिथे टिंडर दोन व्यक्तींची भेट घडून आणते तसे ‘थ्रीन्डर’ हे अ‍ॅप कपल्स अणि सिंगल्सची थ्रीसम पेअरिंग करते. दोघांच्या नावातील साधर्म्य हेच त्यांच्यामधील वादामागचे कारण आहे.

थ्रीन्डरवर ‘ट्रेडमार्क उल्लंघना’ची कायदेशीर तक्रार टिंडरने करण्याचा निर्णय घेतला आहे. नावाचा उच्चार एकसारखा असल्यामुळे लोकांचा गैरसमज होऊ शकतो की दोन्ही अ‍ॅप्स एकाच कंपनीचे आहेत अशी टिंडरला चिंता वाटते. टिंडर अस्तित्त्वात आल्यानंतर दीड वर्षांनंतर थ्रीन्डर अ‍ॅप सुरू झाले.

कायदेशीर कारवाई करण्यामागे टिंडर देत असलेले कारण संयुक्तिक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे. कारण ‘ग्रीन्डर’ किंवा ‘स्पूनर’ या डेटिंग अ‍ॅप्सची नावेदेखील टिंडरच्या नावासारखीच आहेत; पण टिंडरचा त्यांच्यावर आक्षेप नाही. 

थ्रीन्डरनेदेखील कायदेशीर लढाई देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर त्यांनी सोशल मीडियावर ‘#टिंडरसकमायसॉक्स’ या हॅशटॅगद्वारे टिंडरवर हल्ला सुरू केला आहे.

Web Title: Tinder v. Thrinder: The Tosम that Threesom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.