तीन महिन्याआधीच झाला होता इरफानचा साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:03 IST2016-02-06T02:33:06+5:302016-02-06T08:03:06+5:30

इरफान पठाण गुपचूप चढला बोहल्यावर  भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू इरफान पठानने जेद्दा येथे गुपचूप लग्न केल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून

Three months ago, Irfan's match was made | तीन महिन्याआधीच झाला होता इरफानचा साखरपुडा

तीन महिन्याआधीच झाला होता इरफानचा साखरपुडा

फान पठाण गुपचूप चढला बोहल्यावर 

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू इरफान पठानने जेद्दा येथे गुपचूप लग्न केल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याचे फ ोटो चर्चेचा विषय ठरले आहे. रविवारी इरफान हा सौदी अरेबियातील जेद्दा शहरात गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत मोजकेच कुटुंबीय उपस्थित होते. मक्का येथील हराम शेरिफ येथे इरफानचा सफा बेग हिच्याशी निकाह झाला. यानंतर पठाण कुटुबियांनी जेद्दा येथील एका हॉटेल मध्ये भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.


भारतीय वंशाची सफा बेग ही अरब देशांतील प्रसिद्ध मॉडेल आहे. सफा आणि इरफानची भेट दुबईत झाली. त्यावेळी लग्न करण्याचा दोघांनी विचार केला. त्यानंतर इरफानचे कुटुंबीय सफाला भेटण्यासाठी जेद्दाला गेले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने लग्नाचे ठरले. तीन महिन्याआधी दोघांचा सारखपुडा झाला होता असे सांगण्यात येत आहे.  

Web Title: Three months ago, Irfan's match was made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.