असे ओळखा आत्महत्येचे विचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:31 IST
आत्महत्येचा विचार मनात आणणारे लोक अगोदर मदतीचा शोध घेत असतात. तशी मदत मिळाली नाही की मग त्यांचा संयम सुटायला लागतो.
असे ओळखा आत्महत्येचे विचार
काही लोक असेही असतात जे असा विचार मनात आल्यावर स्वत:ला समाजापासून एकदम वेगळे करून टाकतात. म्हणून अशा वाटेवर असणाºयांची लक्षणे, विचार, प्रवृत्ती यांना जाणून घेणे खूप गरजेचे असते. हे वेळीच जाणता आले तर आत्महत्येच्या विचारापासून या लोकांना परावृत्त करणे सहज शक्य होऊ शकते.संकेत ओळखा -असे काही वाक्ये असतात जे मृत्यूच्या संदर्भात आणि स्वत:ला नुकसान करण्याच्या बाबतीत लिहिल्या जातात. 'जर मी जन्माला आलोच नसतो तर.. किंवा आपण नंतर भेटलो तर.. मला मरायलाच हवे' प्राणघातक साधनांना शोधणे- बंदूक, औषधी, चाकू यासारख्या वस्तूंना शोधण्याचा प्रयत्न सातत्याने अशा लोकांकडून केला जातो. ज्याचा प्रयोग आत्महत्या करण्यासाठी केला जाऊ शकतो.मृत्यूच्या विचारात असणे -मृत्यू हा विषय ज्यांसाठी महत्त्वाचा विषय असतो, त्याच्यावर विचार करणे, हिंसक कविता बनवणे, ही सर्व लक्षणे धोकादायक असतात.निराशाची भावना - ज्या युवकाच्या किंवा व्यक्तीच्या आयुष्यात निराशा निर्माण होते. तो नेहमी मृत्यूची भाषा बोलतो. जो एखाद्या प्रकरणात अडकला आहे. तो देखील स्वत:ला बदलू शकत नाही.आत्मघृणा -माझ्या आयुष्याचा काही अर्थच नाही. मी विनाकारण हे आयुष्य जगत आहे. असा विचार करणारे नेहमी आत्मघृणा करत असतात. स्वत:ला कमी लेखणे आणि स्वत:चाच राग करणे यामुळे ती व्यक्ती खचत जाते.