या सहा प्रकारे घरातल्या भिंतींना देता येतो पर्सनल टच! भिंती सुंदर दिसतात आणि डोळेही सुखावतात!

By Admin | Updated: May 11, 2017 18:25 IST2017-05-11T18:25:24+5:302017-05-11T18:25:24+5:30

स्वत:च्या हातानं भिंतीवर चित्रं काढण्याचा हा ट्रेण्ड आता नव्यानं लोकप्रिय झाला आहे. या पेंटिंगमुळे घरातील मोठ्या भिंती सहज डेकोरेट होतात आणि भरीव दिसतात.

These six ways can be given to the houses of the personal touch! The walls look beautiful and their eyes dry! | या सहा प्रकारे घरातल्या भिंतींना देता येतो पर्सनल टच! भिंती सुंदर दिसतात आणि डोळेही सुखावतात!

या सहा प्रकारे घरातल्या भिंतींना देता येतो पर्सनल टच! भिंती सुंदर दिसतात आणि डोळेही सुखावतात!

 

-सारिका पूरकर-गुजराथी

पूर्वी घराच्या भिंती रंगवण्यासाठी आकर्षक रंग नव्हते, वॉलपेपर्सचा तर प्रश्नच नव्हता. मातीनं, शेणानं भिंती सारवून त्यावर हातानं जमेल तशी चित्रं चितारुन भिंती सजवल्या जात असत. वारली चित्रकला, मधुबनी चित्रकलेचा उगम यातूनच झाला. निसर्ग, मानवी संबंध याचेच प्रतिबिंब या चित्रशैलीत आहे. थोडक्यात स्वत:च्या हातानं भिंतीवर चित्रं काढण्याचा हा ट्रेण्ड आता नव्यानं लोकप्रिय झाला आहे. वॉल पेंटिंग हा होम डेकोरमधील सर्वात क्रिएटिव्ह आॅप्शन बनला आहे. या पेंटिंगमुळे घरातील मोठ्या भिंती सहज डेकोरेट होतात आणि भरीव दिसतात. शिवाय आपण निसर्गाच्या सानिध्यात असल्याचाही फील येतो.

१) झाडं आणि पानं

हे डिझाईन वॉल पेंटिंगमध्ये खूप लोकप्रिय आहे. काळा,तपकिरी या दोन रंगांत हे डिझाईन विशेष खुलून दिसतं. भिंतीवर झाडाचा आकार रेखाटून त्याच्या फांद्या, बारीक पानं, त्यावरचे पक्षी हे फक्त प्लेन रंगात रंगवले जातात. दिसायला अगदी सुंदर आणि पर्सनल टच मिळतो. हॉलमध्ये सोफ्यामागची जी भिंत असते, तेथे हे पेंटिंग केलं जातं. तसेच बेडरुममध्ये बेडमागच्या भिंतीवरही केलं जातं. याच डिझाईनमध्ये झाडांच्या फांद्यांवर मधून-मधून तुम्ही फॅमिली फोटोज फ्रेम करुन लावल्यास फॅमिली ट्रीचा फील येतो. झाडाच्या फांद्याच्या ठिकाणीच काही शेल्फ बसवून त्यावर वस्तू ठेवल्यास शेल्फचा एक वेगळा प्रकारही होतो.

 

      

६) जशी रुम तसं पेंटिंग

वर नमूद केलेले डिझाईन्स हे काही बेसिक आणि लोकप्रिय डिझाईन्स आहेत. मात्र घरातील प्रत्येक रुममध्ये त्या त्या रुमला साजेसं पेंटिंगही भिंतीवर करता येतं. किचनमध्ये फळं, भाज्या चितारता येतात. मुला-मुलींच्या खोलीतही कार्टून्सबरोबरच अल्फाबेट्स, अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग साकारता येतात. याशिवाय कलरफूल वेव्ह्ज (लाटा), चेहरे (आऊटलाईन वर्क), स्ट्रिप्स (पट्टे), चेक्स (चौकटी),ब्रिक्स, जॉमेट्रिक आकार देखील भिंतीवर रेखाटून भिंत सजवण्याचा ट्रेण्ड लोकप्रिय झाला आहे.

Web Title: These six ways can be given to the houses of the personal touch! The walls look beautiful and their eyes dry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.