लग्नाआधी लावा या पाच सवयी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:03 IST2016-01-16T01:15:04+5:302016-02-07T08:03:53+5:30

लग्नानंतर टेन्शन नको असेल तर, या पाच सवयी लग्नाआधीच स्वत:ला लावून घ्या.

These five habits before lava! | लग्नाआधी लावा या पाच सवयी!

लग्नाआधी लावा या पाच सवयी!

ळशीच्या लग्नानंतर आपल्याकडे लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. यंदा अनेकांचे बार उडणार असतील. लग्नाच्या तयारीत गुंतलेल्या अनेक तरुण-तरुणींनी सोनेरी स्वप्न रंगवणे सुरू केले असेल पण त्यासोबतच थोडे टेंशनसुद्धा येत असेल. पण, टेन्शन नही लेने का बॉस. खरच हे टेन्शन नको असेल तर या पाच सवयी लग्नाआधीच स्वत:ला लावून घ्या.

1. जोडीदाराला सर्वोच्च प्राधान्य द्या

लग्न म्हणजे आयुष्यभराची कमिटमेंट असते. जिच्यासोबत आयुष्य व्यतीत करायचे आहे त्या व्यक्तीला सर्वोच्च प्राधान्य देणे म्हणूनच तर अनिवार्य आहे. तुमच्या नातेवाईकांशी, जवळच्या मित्रांशी होणार्‍या लाईफ पार्टनरची ओळख करून द्या, जेणे करून तो स्वत:ला अनोळखी समजणार नाही.

2. स्पेस द्यायला शिका

पत्नी म्हणजे अर्धांगीणी असते. परंतु याचा अर्थ असा नाही की तिला तिचे स्वत:चे असे खाजगी आयुष्य राहत नाही. तिच्या हक्काची स्पेस अजिबात हिरावू नको. प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीत लुडबुड करू नका. तिचे कॉल, फेसबुक चेक करण्याचा हट्ट संसारात मोठे वादळ निर्माण करू शकते. जिथे काही शंका असेल तिथे चर्चा करा. समाधान शोधा. पटकन कुठलाही अर्थ काढू नका.

3. एकमेकांचा आदर करा

तुमचा जोडीदार तुमचीच झेरॉक्स कॉपी असेल असे मानणे शुद्ध मूर्खपणा आहे. तिच्या आवडीनिवडी तुमच्यापेक्षा भिन्न असू शकतात. एकमेकांना समजून-उमजून नवनवीन गोष्टी शिकण्याकडे कल असू द्या. यासाठी एकमेकांचा आदर करणे फार गरजेचे असते.

4. धीर धरायलाच हवा

संसारात चढउतार येतच असतात. त्यामुळे लगेच राग व्यक्त करू नका. थोडा धीर धरायला शिका. सुरुवातीचा काही काळ तुमची वेव्हलेंग्थ जुळण्यास लागेल. तुम्ही काहीही न बोलता जोडीदाराने तुमच्या मनातील गोष्ट ओळखावी, अशी अपेक्षा करत असाल तर आधी ते थांबवा.

5. आर्थिकबाबतीत प्रामाणिक राहा

घर-संसार चालवायचा म्हणजे पैसा तर लागणारच. आजही कुटुंबाची आर्थिक जबाबदारी ही पुरुषावर असते. पण याचा अर्थ बायकोने केवळ घर सांभाळावे असा होत नाही. घराचा खर्च, बजेट आदी बाबी तिच्याशी सल्ला मसलत करूनच ठरवा. पैशांच्या बाबतीत ती जो तुमच्यावर आंधळा विश्‍वास ठेवते त्याचा गैरफायदा घेऊ नका.

Web Title: These five habits before lava!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.