दिवाळीत तंग कपडे नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:58 IST2016-01-16T01:14:32+5:302016-02-06T11:58:07+5:30

सोनम कपूरने व्यक्त केले मत 'प्रेम रतन धन पायो'ची अभिनेत्री सोनम कपूरने फॅशनवर आपले मत व्यक्त केले आहे. विशेषत: फेस्टिव्हलमध्ये तंग कपडे टाळले पाहिजेत, असे सोनमने म्हटले आहे.

There is no tight clothing in the Diwali | दिवाळीत तंग कपडे नको

दिवाळीत तंग कपडे नको

नम म्हणते, मला नेहमीच व्हॅलेंटाईन मूडमधील पेहराव आवडतो. कोणाचीही पर्वा न करता मला जे आवडते ते मी परिधान करते. त्यात मला गैर काहीच वाटत नाही. पारंपरिक व्यवस्थेने घालून दिलेल्या बंधनात न राहता नवा प्रयोग करायला हवा. मला लांब कपडे, आणि ऑर्नामेंटस् वापरायला आवडते. जेव्हा फॅशनचा विषय येतो, तेव्हा मी मल्टीपल विचार करते. आपण वेगवेगळ्य़ा भूमिकेत वावरत असतो, त्यामुळे त्या त्या प्रसंगाला अनुरुप कपडे आपण वापरले पाहिजेत. पुरुषांच्या कपड्यांबाबत विचाराल तर रॉक सूट त्यांना अधिक खुलून दिसतो, त्यांनी तो तसा केला पाहिजे. प्रत्येक तरुणाला कुणी तरी टेलर सोबत दिला पाहिजे. कारण ते खरेदी करताना नेमके कधी शोल्डर मोठय़ा होतात, तर कधी पँट उंचीला कमी पडते, किवा अधिक होते, असे दिसते. माझे हे निरीक्षण कदाचित सगळ्य़ांचेच असेल, पण हे खरे आहे. इम्रान खान आणि माझे बाबा या बाबतीत अधिक जागरूक असल्याचे दिसते. फेस्टिव्ह सीझनमधल्या फॅशनचा विचार करता, विशेषत: महिलांनी पारंपरिक पेहराव केला पाहिजे, असे मला वाटते. महिला साडीमध्ये खूप सुंदर दिसतात. त्यामुळे दिवाळीसारख्या सणांच्या दिवसांत महिलांनी साडी परिधान करावी, असेही तिने सांगितले आहे.

Web Title: There is no tight clothing in the Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.