​भारतीय महिलांसाठी ‘मेक-अप’ नाही महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 17:19 IST2016-06-07T11:49:55+5:302016-06-07T17:19:55+5:30

पहिल्या डेटवर जाताना भारतीय महिला मेक-अपऐवजी स्वत:च्या नैसर्गिक सौंदर्यावर अधिक अवलंबून असतात.

There is no important make-up for Indian women | ​भारतीय महिलांसाठी ‘मेक-अप’ नाही महत्त्वाचा

​भारतीय महिलांसाठी ‘मेक-अप’ नाही महत्त्वाचा

िला मेक-अपसाठी किती वेळ लावतात याची कुणकुण नेहमीच ऐकायला मिळते. कोणत्याही कार्यक्रमाला जायचे म्हटले की, यामुळे उशिर होतो असा टोमणा ठरलेलाच.

घराच्या बाहेर पडायचे म्हटले तर आधी मेक-अप असा काहीसा मुलींबाबत समज चांगलाच रुढ झालेला आहे. मग पहिल्या डेटवर मुली कि ती मेक-अप करत असतील?

हसू नका! कारण एका सर्वेक्षणातून याबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. पहिल्या डेटवर जाताना भारतीय महिला मेक-अपऐवजी स्वत:च्या नैसर्गिक सौंदर्यावर अधिक अवलंबून असतात.

एका मॅचमेकिंग अ‍ॅप व ब्युटी प्रोडक्ट कंपनीने केलेल्या या सर्व्हेमध्ये सुमारे 500 महिलांनी सहभाग घेतला होता. विविध वयोगटातील 51 टक्के महिलांनी पहिल्या डेटवर जाताना मेक-अप करण्यावर भर देत नसल्याचे सांगितले.

सुमारे 45 टक्के महिलांना मान्य केले की, लिप ग्लॉस लावल्याशिवाय त्या डेटवर जात नाही. त्यानंतर मस्करा (31 टक्के), मॅटिफायिंग पॉवडर (16 टक्के) आणि ब्लश (8 टक्के) अशा सौंदर्यप्रसाधनांचा क्रमांक येतो. लिपस्टिकच्या रंगामध्ये 37 टक्के महिलांनी रुबी रेड, हॉट पिंक (32 टक्के) आणि 20 टक्के महिलांनी दोन शेडस् मिक्स करतात असे सांगितले.

फर्स्ट डेटवर जाताना मेक-अप करताना 54 टक्के महिलांना हेव्ही फाउंडेशनची अधिक काळजी वाटते. या सर्व्हेतून निदान महिलांबाबतीत असणारा ‘मेक-अप’ गैरसमज दूर होईल अशी अपेक्षा करणे चूक ठरू नये.

Web Title: There is no important make-up for Indian women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.