पृथ्वीवर असू शकतात 1 लाख कोटी प्रकारचे जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 16:45 IST2016-05-22T11:11:46+5:302016-05-22T16:45:36+5:30

आधुनिक विज्ञानाच्या युगातही केवळ 0.001 टक्के सजीवांच्या प्रजाती आपल्याला ज्ञात आहेत.

There can be 1 lakh crores of creatures on the planet | पृथ्वीवर असू शकतात 1 लाख कोटी प्रकारचे जीव

पृथ्वीवर असू शकतात 1 लाख कोटी प्रकारचे जीव

र्षक वाचून एकावर किती शुन्य असतील याचा हिशोब करताय? ते सोडा. उत्तर आहे 12 शुन्य. सुक्ष्मजीवांसंबंधी माहितीचे विश्लेषण करणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संशोधनातून हा असा अंदाज बांधण्यात आला आहे की, या पृथ्वीतलावर एक ट्रिलियन (एक लाख कोटी) प्रजातींचे जीव असू शकतात.

विशेष म्हणजे यांपैकी 99.999 टक्के जीव आपल्याला माहितीच नाहीत! याचाच अर्थ की, डोळे दिपवून टाकण्याऱ्या आधुनिक विज्ञानाच्या युगातही केवळ 0.001 टक्के सजीवांच्या प्रजाती आपल्याला ज्ञात आहेत.

अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठातील जे लेनॉन यांनी सांगितले की, संपूर्ण पृथ्वीवर सजीवांच्या किती प्रकारच्या प्रजाती आहेत याचा अंदाज काढणे ही जीवशास्त्र शाखेतील सर्वात मोठे आव्हान आहे.

या संशोधनात वैज्ञानिकांनी प्रशासन, शैक्षणिक आणि इतर वैज्ञानिक संस्थांच्या मार्फत सुक्ष्मजीव, वनस्पती आणि प्राण्यांसंदर्भातील संपूर्ण माहिती गोळा केली.

अशा प्रकारचा हा आतापर्यंतचा सर्वात भव्य प्रकल्प होता. यामध्ये अंटाक्टिका वगळता सुमारे 35 हजार ठिकाणांवरील 56 लाख प्रजातींची माहिती जमा झाली. याच्या विश्लेषणातून पृथ्वीवर एकूण किती प्रजाती असू शकतात याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यासाठी यापूर्वी ठोस अशी वैज्ञानिक पद्धती उपलब्ध नव्हती. मात्र, जेनेटिक सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ते आता शक्य झाले आहे, अशी माहिती संशोधनात सहभागी झालेले जे लेनॉन यांनी दिली.

Web Title: There can be 1 lakh crores of creatures on the planet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.