​तरुणींचा इमोशन फंडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 02:46 IST2016-02-20T09:46:28+5:302016-02-20T02:46:28+5:30

उच्च इमोशनल इंटेलिजन्स असणाºया तरुण मुलींमध्ये समाजविरोधी कार्य करण्याची वृत्ती अधिक असते. 

Teenage Emotion Fund! | ​तरुणींचा इमोशन फंडा!

​तरुणींचा इमोशन फंडा!

्नी असो वा गर्लफ्रेंड, भांडण झाल्यावर बिचाऱ्या मुलालाचा माफी मागावी लागते. भांडणाचा विषय मुली अशा काही पद्धतीने फिरवतात की, त्यांची चुक असूनही मुलाला वाटते की सगळी चूक आपली आहे.

समोरच्याच्या भावनांशी खेळ करून त्यांच्यावर प्रभाव पाडण्याची मुलींची क्षमता वाखण्याजोगी आहे. त्यांच्या या क्षमेतेचे कारण म्हणजे त्यांची हायर इमोशनल इंटेलिजन्स (भावनिक बुद्ध्यांक).

एका नवीन रिसर्चनुसार उच्च इमोशनल इंटेलिजन्स असणाºया तरुण मुलींमध्ये समाजविरोधी कार्य करण्याची वृत्ती अधिक असते.

इंग्लंडमधील प्लायमाऊथ विद्यापीठातील प्रमुख संशोधक अ‍ॅलिसन बेकन यांनी माहिती दिली की, ‘उत्क्रांतीमुळे मुलींमध्ये दुनियादारीत टिकून राहण्यासाठी समाजाचे नियम स्वत:च्या सोयीनुसार मोडण्याची प्रवृत्ती वाढली आहे.’

woman

तरुण मुलांपेक्षा इमोशनल इंटिलिजन्स जास्त असणाऱ्या तरुणींमध्ये गुन्हा करण्याचा कल जास्त का असतो याचा  शोध घेण्यासाठी हे संशोधकांनी १२५ तरुणींचा मचियावेलियनिजम्, दुसºयांच्या भावनांशी खेळ आणि दोषी वर्तनाची स्वकबुली अशा तीन निकषांवर अभ्यास करण्यात आला. तसेच प्रश्नावलीमध्ये त्यांना विचारण्यात आले की, दिलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी दुसºयांच्या भावनांचा कसा उपयोग करून घेतात?

Web Title: Teenage Emotion Fund!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.