TECH : स्मार्टफोनच्या चार्जिंगचा वेग दुपटीने वाढविण्यासाठी खास टिप्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 18:22 IST2017-04-25T12:52:53+5:302017-04-25T18:22:53+5:30

मोबाइल धारकांना नेहमी सतावणारी समस्या म्हणजे बॅटरी संपणे होय. प्रत्येकाला वाटते की, आपल्या फोनची बॅटरी लवकर संपू नये. मात्र वाढता वापर पाहता, बॅटरी लवकर संपते आणि पुन्हा पुन्हा चार्ज करावा लागतो.

TECH: Smart Tips to Increase the Charging Speed ​​of the Smartphone! | TECH : स्मार्टफोनच्या चार्जिंगचा वेग दुपटीने वाढविण्यासाठी खास टिप्स !

TECH : स्मार्टफोनच्या चार्जिंगचा वेग दुपटीने वाढविण्यासाठी खास टिप्स !

ong>-Ravindra More 
मोबाइल धारकांना नेहमी सतावणारी समस्या म्हणजे बॅटरी संपणे होय. प्रत्येकाला वाटते की, आपल्या फोनची बॅटरी लवकर संपू नये. मात्र वाढता वापर पाहता, बॅटरी लवकर संपते आणि पुन्हा पुन्हा चार्ज करावा लागतो. मात्र आयफोन  वापरकर्त्यांसाठी आम्ही काही टिप्स देत असून त्याद्वारे आपला फोनच्या चार्जिंगचा वेग दुपटीने वाढण्यास मदत होईल. 

* सर्वेत्तम चार्जरचा वापर
चांगल्या गुणवत्तेचे चार्जर वापरल्याने फोन लगेच चार्ज होईल. आयफोनच्या चार्जरपेक्षा आयपॅड चार्जरचे पावर आऊटपुट देते. यामुळे तुमची बॅटरी त्वरित चार्ज होईल. परंतु यामुळे बॅटरीवर अधिक ताण येऊन ती खराब होण्याची शक्यता काही जण वर्तवतात.

* फ्लाईट मोडचा वापर
फोन चार्ज करताना फ्लाईट मोड आॅन केल्यास आयफोन लवकर चार्जिंग होतो. फ्लाईट मोडवर तुमचा फोन वाय-फाय, मोबाइल नेटवर्क यांच्याशी कनेक्टेड नसल्याने चार्जिंगचा वेग वाढतो. 

* पुश नोटिफिकेशन बंद करा
फोन लॉक असल्यावरही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपचे नोटिफिकेशन किंवा एसएमएस नोटिफिकेशन स्क्रीनवर दिसतात. या नोटिफिकेशनला आॅफ करून तुम्ही आपल्या फोनची बॅटरी वाचवू शकता. 

* लो पावर मोड आॅन करा 
सेटिंग मेनूमधील बॅटरी आॅप्शनमध्ये जाऊन लो पावर मोड अ‍ॅक्टिवेट करा. यामुळे तुमच्या स्क्रीनला लागणारी एनर्जी कमी होईल.

Web Title: TECH: Smart Tips to Increase the Charging Speed ​​of the Smartphone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.