TECH : खास भारतीयांसाठी 'स्काइप लाईट' अ‍ॅप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 18:07 IST2017-03-19T12:37:50+5:302017-03-19T18:07:50+5:30

इंटरनेटचा वेग संथ असतानाही उत्तमरीत्या चालणारे ‘स्काईप लाईट’ अ‍ॅप खास भारतीय यूजर्ससाठी सादर करण्यात आले आहे.

TECH: 'Skype Lite' app for special Indians! | TECH : खास भारतीयांसाठी 'स्काइप लाईट' अ‍ॅप !

TECH : खास भारतीयांसाठी 'स्काइप लाईट' अ‍ॅप !

टरनेटचा वेग संथ असतानाही उत्तमरीत्या चालणारे ‘स्काईप लाईट’ अ‍ॅप खास भारतीय यूजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅपला ‘आधार’शी अटॅच करण्यात आले आहे. 
भारतातील यूजर्सना संथ इंटरनेटमुळे  वेगाची समस्या नेहमीच भेडसावते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्टने ‘स्काइप’ची लाईट आवृत्ती लॉन्च केली आहे. मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मायक्रोसॉफ्टच्या प्रतिनिधींनी ‘स्काइप लाईट’ हे अ‍ॅप सादर केले. हे अ‍ॅप अवघ्या १३ एमबी इतक्या आकाराचे आहे. अर्थात ते अगदी टु-जी इंटरनेट वापरणाराही आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करू शकतो. याच्या मदतीने इन्स्टंट मेसेजिंग, आॅडिओ व व्हिडीओ कॉलिंग आदींसह स्काईप बॉटचा वापर करता येईल. यात डेटा काँप्रेस करण्याचे खास तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे कमी डेटा वापरतानाही स्काईपचे पूर्ण फंक्शन्स वापरता येतात.
स्काइप लाईट या अ‍ॅपला कुणीही यूजर आपले ‘आधार’ संलग्न करू शकतो. याला कुणीही अँड्रॉईड यूजर डिफॉल्ट डायलर आणि इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप म्हणूनही वापरू शकतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या अ‍ॅपमध्ये मराठीसह भारतीय भाषांचा सपोर्टदेखील प्रदान करण्यात आला आहे. 

Web Title: TECH: 'Skype Lite' app for special Indians!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.