TECH : ​सॅमसंगचे बहुचर्चित Galaxy S8, Galaxy S8+ स्मार्टफोन भारतात launch !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 18:37 IST2017-04-19T13:07:47+5:302017-04-19T18:37:47+5:30

लेटेस्ट टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असे सॅमसंग कंपनीचे बहुचर्चित गॅलक्सी एस 8 आणि गॅलक्सी एस 8 प्लस या स्मार्टफोनचे लॉन्चिंग नुकतेच दिल्ली येथील एका कार्यक्रमात करण्यात आले.

TECH: Samsung's flagship Galaxy S8, Galaxy S8 + smartphone launch in India! | TECH : ​सॅमसंगचे बहुचर्चित Galaxy S8, Galaxy S8+ स्मार्टफोन भारतात launch !

TECH : ​सॅमसंगचे बहुचर्चित Galaxy S8, Galaxy S8+ स्मार्टफोन भारतात launch !

ong>-Ravindra More
लेटेस्ट टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असे सॅमसंग कंपनीचे बहुचर्चित गॅलक्सी एस 8 आणि गॅलक्सी एस 8 प्लस या स्मार्टफोनचे लॉन्चिंग नुकतेच दिल्ली येथील एका कार्यक्रमात करण्यात आले. हे मोबाइल 5 मे नंतर भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असून सध्या या दोन्ही स्मार्टफोनची प्री-आॅर्डर फ्लिपकार्डवर आॅनलाइन करता येणार आहे.
किमतीचा विचार केला तर या दोन्ही स्मार्टफोनची अमेरिकेपेक्षा भारतात जास्त किंमत आहे. ती अशी की, सॅमसंग गॅलक्सी एस 8 ची किंमत 57,900 रुपये आहे, तर सॅमसंग गॅलक्सी 8 प्लसची किंमत 64,900 रुपये इतकी आहे. अमेरिकेत सॅमसंग गॅलॅक्सी एस 8 ची 720 डॉलर्स (46,700 रुपये) आणि सॅमसंग गॅलक्सी 8 प्लसची 840 डॉलर्स (54,500 रुपये) इतकी आहे.
दोन्ही स्मार्टफोन मिडनाईट ब्लॅक, कोरल ब्लू आणि मॅपल गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहेत. तसेच, या दोन्ही स्मार्टफोनमध्ये सॅमसंगने आपला Exynos 8895 प्रोसेसर लावला आहे. या प्रोसेसरमध्ये  2.35 GHz चा  क्वॉड कोअर मॉड्यूल बसविण्यात आले आहे. तसेच दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.
याचबरोवर 256 जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्ड वापरता येणार आहे. गॅलक्सी एस8 आणि एस8 प्लसमध्ये १२ मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.  तसेच, गॅलक्सी एस-8 मध्ये 3000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर एस 8 प्लसमध्ये 3500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
मार्च 2016 मध्ये कंपनीने सॅमसंग गॅलॅक्सी एस 7 आणि सॅमसंग गॅलॅक्सी एस 7 एग्ज हे दोन स्मार्टफोन भारतात लॉंच केले होते. त्याला मिळालेल्या यशानंतर सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलॅक्सी एस 8 आणि गॅलॅक्सी एस 8 प्लस स्मार्टफोन भारतीय बाजारात आणले आहेत.   

Web Title: TECH: Samsung's flagship Galaxy S8, Galaxy S8 + smartphone launch in India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.