TECH : ​आता व्हॉट्सअ‍ॅप आपणास चॅट मॅसेजेस ऐकवणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 18:09 IST2017-04-28T12:36:56+5:302017-04-28T18:09:26+5:30

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे येणारे मॅसेजेस ऐकता येण्याची सुविधा सध्या केवळ आयफोन यूजर्ससाठी आहे. मात्र लवकर ही सुविधा अ‍ॅण्ड्रॉइडधारकांसाठी सुरु होण्याचे संकेत आहेत..

TECH: Now Whatsapp will hear you chat messages! | TECH : ​आता व्हॉट्सअ‍ॅप आपणास चॅट मॅसेजेस ऐकवणार!

TECH : ​आता व्हॉट्सअ‍ॅप आपणास चॅट मॅसेजेस ऐकवणार!

हॉट्सअ‍ॅपद्वारे येणारे मॅसेजेस ऐकता येण्याची सुविधा सध्या केवळ आयफोन यूजर्ससाठी आहे. मात्र लवकर ही सुविधा अ‍ॅण्ड्रॉइडधारकांसाठी सुरु होण्याचे संकेत आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपणास व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावे लागेल. त्यानंतर आयफोनमधील सिरीच्या माध्यमातून तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस ऐकायला मिळणार आहेत.

विशेष म्हणजे हे व्हॉट्सअ‍ॅपचे नवे व्हर्जन ८९ एमबीचे असून ज्यामध्ये ४ नवे अपडेट्स जोडले गेलेले आहेत. या व्हर्जनमध्ये सिरीच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस यूजर्सला बोलून दाखविण्यात येणार आहेत. यासोबतत फोन कॉल्स टॅब, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आणि ग्रुप इन्फॉर्मेशन हे सर्व स्टेट्स एकत्रित पहायला मिळणार आहेत.

आयफोनमधील सिरी सॉफ्टवेअरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या आधीपासूनच इतर मेसेजेस सेंड करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. मात्र, आता नव्या व्हर्जनमध्ये सिरी आपणास व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचून दाखविणार आहे. सिरीमध्ये आता ड्रायव्हिंग दरम्यान वापरण्यात येणाºया हँड्स फ्री सपोर्टचे फिचरही लवकरच उपलब्ध होणार आहे.

मेसेज आॅडिओ फिचरनंतर आता फोनमध्ये अधिकतर मेसेजेस अनरीड होणार आहेत. कारण, आता Hey Siri, read my last WhatsApp message असे म्हणताच सिरी तुमच्या आदेशाचे पालन करत मेसेज वाचून दाखविणार आहे. एवढेच नाही तर तुम्ही सिरीला कमांड देवून त्या मेसेजला रिप्लायही करु शकणार आहात.

सध्या केवळ आयफोन यूजर्ससाठीच ही सुविधा उपल्बध आहे. मात्र, यासाठी तुम्हाला तुमचे हँडसेट iOS 10.3+ व्हर्जनने अपडेट करावे लागणार आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या अपडेटेड व्हर्जनमध्ये पारशी भाषेचेही आॅप्शन देण्यात आले आहे.

Also Read : ​TECH : आता व्हॉट्स अ‍ॅपद्वारे मित्रांवर ठेवा नजर !
                   : ​​TECH : व्हॉट्स अ‍ॅपवर नवीन इमोजींचा समावेश !

Web Title: TECH: Now Whatsapp will hear you chat messages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.