TECH : हे आहे सर्वाधिक सर्च केले जाणारे अॅप !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 18:46 IST2017-03-28T13:16:09+5:302017-03-28T18:46:09+5:30
स्नॅपचॅटनुसार दरदिवशी ही सेवा १५८ दशलक्ष वापरतात आणि यादरम्यान एकूण २.५ दशकोटी स्नॅप्स तयार होतात.
.jpg)
TECH : हे आहे सर्वाधिक सर्च केले जाणारे अॅप !
फ र्ब्स मॅगझीनमधील एका अहवालानुसार स्नॅपचॅटने आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अॅप स्टोअरच्या सर्च वॉल्युममध्ये अग्रस्थान मिळवले आहे. एका प्रसिद्धी माध्यमानुसार स्नॅपचॅट हे आयओएसवर सर्वाधिक सर्च केले जाणारे अॅप असल्याचे म्हटले आहे. स्नॅपचॅटनुसार दरदिवशी ही सेवा १५८ दशलक्ष वापरतात आणि यादरम्यान एकूण २.५ दशकोटी स्नॅप्स तयार होतात.
सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या अॅप्सच्या या यादीत फेसबुकच्या मालकीचे इन्स्टाग्राम अॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोशल मीडिया सम्राट फेसबुकचे मोबाईल अॅप या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुगलचा व्हिडिओ प्लॅटफॉर्म असलेले यूट्यूब चौथ्या क्रमांकावर आहे. लहान मुलांना केंद्रित करून बनवलेले मॅसेजिंग अॅप किक पाचव्या क्रमांकावर आहे तर बुद्धिवादी लोकांच्या पसंतीचे ट्विटर मात्र या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.