Tech : खास भारतीयांसाठी ‘Youtube Go’ अॅप लॉन्च, स्लो इंटरनेटवरही मिळेल व्हिडीओचा आनंद !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 11:44 IST2017-04-06T06:14:01+5:302017-04-06T11:44:01+5:30
विना बफरिंग होता व्हिडीओचा आनंद घेता यावा म्हणून खास भारतीयांसाठी ‘यूट्यूब गो’ अॅप लॉन्च केले आहे.
.jpg)
Tech : खास भारतीयांसाठी ‘Youtube Go’ अॅप लॉन्च, स्लो इंटरनेटवरही मिळेल व्हिडीओचा आनंद !
भ रतातील फास्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या लक्षात घेता यु ट्यूबने स्लो इंटरनेट असेल तरीही विना बफरिंग होता व्हिडीओचा आनंद घेता यावा म्हणून खास भारतीयांसाठी ‘यूट्यूब गो’ अॅप लॉन्च केले आहे. याबाबत मंगळवारी गुगलने माहिती दिली. या अॅपला आम्ही भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती म्हणून पाहत आहोत, कारण भारतात अजूनही फास्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी एक मोठी समस्या आहे असं कंपनीने म्हटलं आहे. यु ट्यूब या मुख्य अॅपचं ‘युु ट्यूब गो’ हे लाइटर व्हर्जन आहे. या अॅपद्वारे व्हिडीओ डाऊनलोड करणं आणि शेअर करणं अगदी सहज शक्य होणार आहे. लाइटर व्हर्जन असल्याने अॅप वापरताना युजरला जास्त कंट्रोल मिळेल तसेच स्लो इंटरनेट स्पीड असेल तरीही अॅप योग्य प्रकारे काम करेल असा दावा करण्यात आला आहे. या अॅपचं बीटा व्हर्जन उपलब्ध आहे, गुगल प्ले स्टोअरवरून बीटा व्हर्जन डाऊनलोड करता येऊ शकतं.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गुगलने या अॅपची घोषणा केली होती, मात्र युट्यूबने आत्ता हे अॅप युजर्ससाठी उपलब्ध केलं आहे. अॅप आणखी चांगलं बनवण्यासाठी थोडा वेळ घेतला असं गुगलने सांगितलं आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गुगलने या अॅपची घोषणा केली होती, मात्र युट्यूबने आत्ता हे अॅप युजर्ससाठी उपलब्ध केलं आहे. अॅप आणखी चांगलं बनवण्यासाठी थोडा वेळ घेतला असं गुगलने सांगितलं आहे.