TECH : जग अधिक जवळून बघा ‘गुगल अर्थ’ च्या साह्याने !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 18:03 IST2017-04-19T12:29:08+5:302017-04-19T18:03:38+5:30
विशेष म्हणजे युजर्सला या मॅपच्या माध्यमातून आणखी क्लिअर आणि जवळचं चित्र बघायला मिळणार आहे.
.jpg)
TECH : जग अधिक जवळून बघा ‘गुगल अर्थ’ च्या साह्याने !
-Ravindra More
नुकतेच यूयॉर्क येथे पृथ्वी दिवसाच्या निमित्ताने गुगलने त्यांच्या गुगल मॅप या फ्री सर्व्हिचं रि-इमॅजिनेड व्हर्जन लॉन्च केलं आहे. गुगल अर्थचे डिरेक्टर रेबेका मुरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ‘हे जगाला आमचं गिफ्ट आहे.’ विशेष म्हणजे युजर्सला या मॅपच्या माध्यमातून आणखी क्लिअर आणि जवळचं चित्र बघायला मिळणार आहे. शिवाय युजर्स उपग्रहांद्वारे घेण्यात आलेले पृथ्वीचे फोटो पाहू शकतात. हे फोटो १५ मीटर ते १५ सेंटीमीटर दरम्यानचं रिझॉल्युशन वापरतं. गुगल अर्थवर कोणत्याही परिसराला सर्च केलं जाऊ शकतं. गुगल मॅपच्या या व्हर्जनमधून लोकांना चित्रांसोबतच माहितीही दिली जाणार आहे. लोकांना त्यातून एज्युकेट केलं जाणार आहे. गुगल मॅपला आणखी जास्त अपडेट करून अधिक जास्त सूक्ष्म माहिती त्यातून दाखवली जाणार आहे. गुगलला जगाबद्दल सर्वकाही माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला यामाध्यमातून जगाची माहिती मिळणार आहे.
या नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या सेवेनुसार युजर्सना त्यांच्या कम्प्युटर्स, स्मार्टफोन आणि टॅबलेटवरून याचा आणखीन जास्त चांगला अनुभव घेता येणार आहे.
जगाची सफर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://www.google.com/earth/