TECH : जगातील पहिला "थर्मल इमेज स्कॅन" करणारा स्मार्टफोन दाखल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 13:29 IST2017-03-18T07:59:42+5:302017-03-18T13:29:42+5:30
थर्मल इमेज स्कॅन करणारा जगातील पहिला स्मार्टफोन भारतात लवकरच दाखल होत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रुफ आणि शॉकप्रुफदेखील आहे.

TECH : जगातील पहिला "थर्मल इमेज स्कॅन" करणारा स्मार्टफोन दाखल !
थर्मल इमेज स्कॅन करणारा जगातील पहिला स्मार्टफोन भारतात लवकरच दाखल होत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रुफ आणि शॉकप्रुफदेखील आहे.
थर्मल इमेज स्कॅनिंग तंत्रज्ञान बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. शिवाय बाईकर्स, पर्यटक आदींनाही या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. याच पार्श्वभूमिवर कॅटरपिलर या कंपनीने ‘कॅट एस६०’ हा थर्मल इमेज स्कॅनिंगची सुविधा असणारा स्मार्टफोन विकसित केला आहे. याच्या मागील बाजूस दोन कॅमेरा सेन्सर असतील. यातील एक सेन्सर हे नियमित फोटोग्राफीसाठी तर दुसरे हे थर्मल इमेजींगसाठही असेल. शिवाय ४.७ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात आॅक्टॉ-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६१७ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. यातील बॅटरी ३८०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात येणार असले तरी या स्मार्टफोनची किंमत किती असेल हे जाहीर करण्यात आले नाही.