TECH : ​आपल्या ‘फेसबुक’ला अपडेट केले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2017 17:33 IST2017-04-04T12:03:51+5:302017-04-04T17:33:51+5:30

फेसबुकचा नुकताच नवा अपडेट आला असून त्यात यूजर्सला छायाचित्रे शेअर करण्याआधी त्यावर अतिशय आकर्षक इफेक्ट प्रदान करणारे फिचर देण्यात आले आहे.

TECH: Did your 'Facebook' update? | TECH : ​आपल्या ‘फेसबुक’ला अपडेट केले का?

TECH : ​आपल्या ‘फेसबुक’ला अपडेट केले का?

सबुकचा नुकताच नवा अपडेट आला असून त्यात यूजर्सला छायाचित्रे शेअर करण्याआधी त्यावर अतिशय आकर्षक इफेक्ट प्रदान करणारे फिचर देण्यात आले आहे. अलीकडेच स्रॅपचॅटची नक्कल करीत फेसबुकने स्नॅपचॅटप्रमाणेच ‘स्टोरीज’ हे फिचर प्रदान केले आहे. यासोबत अ‍ॅपच्या कॅमेऱ्याला अपडेट करत आता छायाचित्रांना स्पेशल इफेक्ट देण्यात आले आहे. यात कुणीही आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यातून काढलेले फोटो शेअर करण्याआधी त्याला एडीट करून अतिशय आकर्षक असे व्हिज्युअल इफेक्ट देऊ शकतात.
फेसबुकने सध्या शंभरापेक्षा जास्त स्पेशल इफेक्ट दिले असून भविष्यात यात वाढ करण्यात येईल असे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे यात काही विख्यात चित्रपटांमधील पात्रांच्या मुखवट्यांचाही समावेश आहे. अर्थात आता कुणीही युजर आपल्या छायाचित्रांना सुशोभित करून शेअर करू शकेल. याचा वापर करण्यासाठी युजरला अ‍ॅपमध्ये असणाऱ्या कॅमेऱ्याच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल.

Web Title: TECH: Did your 'Facebook' update?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.