TECH ALERT : या तारखेनंतर ‘विंडोज व्हिस्टा’ वापरणे ठरेल धोकेदायक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 17:44 IST2017-03-24T12:14:49+5:302017-03-24T17:44:49+5:30

मायक्रोसॉफ्टने या प्रणालीचा सिक्युरिटी सपोर्ट काढण्याची घोषणा केली असून एका ठराविक तारखेनंतर ही प्रणाली वापरणे धोकेदायक ठरु शकते.

TECH ALERT: It will be dangerous to use 'windows vista' after this date! | TECH ALERT : या तारखेनंतर ‘विंडोज व्हिस्टा’ वापरणे ठरेल धोकेदायक !

TECH ALERT : या तारखेनंतर ‘विंडोज व्हिस्टा’ वापरणे ठरेल धोकेदायक !

०७ मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज व्हिस्टा ही आॅपरेटिंग सिस्टीम लॉन्च केली होती. मात्र आता मायक्रोसॉफ्टने या प्रणालीचा सिक्युरिटी सपोर्ट काढण्याची घोषणा केली असून एका ठराविक तारखेनंतर ही प्रणाली वापरणे धोकेदायक ठरु शकते. 
सुरुवातीला या प्रणालीस उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मात्र यानंतर या प्रणालीची लोकप्रियता कमीकमी होत गेली. विशेष म्हणजे सिक्युरिटीबाबतच्या अनेक गंभीर बाबी लक्षात आल्यानंतर युजर्सने या प्रणालीकडे पाठ फिरवली. शिवाय या बाबींकडे मायक्रोसॉफ्टनेही याकडे फारसे लक्ष दिले नाही. अधून-मधून ही कंपनी या प्रणालीचे अपडेट सादर करत होती. आता मात्र ११ एप्रिलपासून विंडोज व्हिस्टाचा सिक्युरिटी सपोर्ट काढण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टतर्फे करण्यात आली असून ही आॅपरेटींग सिस्टीम लवकरच इतिहासजमा होणार आहे. अर्थात यानंतर ही प्रणाली वापरणे अतिशय धोकादायक ठरणार आहे. 

Web Title: TECH ALERT: It will be dangerous to use 'windows vista' after this date!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.