TECH : हा आहे सर्वसामान्यांना परवडणारा ७,४९९ किमतीचा स्मार्टफोन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 17:30 IST2017-04-19T11:54:31+5:302017-04-19T17:30:28+5:30
आपणास कमी किमतीत advance feature चा स्मार्टफ़ोन हवा आहे का? जाणून घ्या....

TECH : हा आहे सर्वसामान्यांना परवडणारा ७,४९९ किमतीचा स्मार्टफोन !
हुवेई या प्रसिद्ध कंपनीने भारतात सर्वसामान्यांना परवडणारा स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला आहे. त्याची किं मत केवल ७ हजार ४९९ असून १९ एप्रिल पासून हा मोबाइल आॅफलाइन पद्धतीने घेता येणार आहे. या मोबाइलसाठी १५ महिन्यांची वॉरंटी मिळणार असून गोल्ड, व्हाईट आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे.
याचा ४.५ इंच डिस्प्ले, १ गीगा क्वार्ज कोअर प्रोसेसर मिळणार आहे. एंड्रोइड स्मार्टफोन ५.१ लॉलीलॉप आणि आॅपरेटींग सिस्टिम २१०० mAh Li-Poly बॅटरी आहे.
या मोबाईलसोबत १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल स्टोरेज ही मेमरी ३२ जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डने वाढवता येऊ शकेल.
याचा फ्रंट कॅमेरा २ मेगा पिक्सल आहे तर बॅक कॅमेरा ५ मेगा पिक्सल आहे. यामध्ये ड्युअल सिम,४जी वोल्ट, वायफाय, वायफाय हॉटस्पॉट, जीपीएस, मायक्रो युएसबी पोर्ट असणार आहे.
विशेष म्हणजे द होनर बी २ मध्ये रेनबो लाईट नावाचे स्पोर्ट्स फिचर असणार आहे. कॉल आल्यावर, कम्युनिकेशन, नोटीफिकेशनवेळी वायब्रंट कलर येऊन लाईट ब्लीक होईल.
याविषयी वाईस प्रेसिडेंट पी. संजीव यानी सांगितले की, भारतात द हॉनर बी २ आणताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही सर्व स्तरापर्यंतच्या ग्राहकांपर्यत पोहोचू. द हॉनर बी २ हा सर्वांच्या खिशाला परवडणारा आणि चांगले फिचर्स असलेला मोबाईल आहे. भारतातील ग्राहक डोळ्यासमोर ठेवून बनविलेले मोबाईलचे सुंदर डिझाइन आणि बेस्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरही या मोबाईलमध्ये असल्याचेही ते म्हणाले.