​तन्मय भटवर आशा भोसले कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 17:06 IST2016-06-01T11:36:41+5:302016-06-01T17:06:41+5:30

भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर ‘एआयबी' शोचा कलाकार तन्मय भटने केलेल्या अश्लाघ्य व्हिडीओविरोधात सर्वच स्तरातून टीका होत आहे.

Tanmay Bhatwar Asha Bhosale Kadadale | ​तन्मय भटवर आशा भोसले कडाडल्या

​तन्मय भटवर आशा भोसले कडाडल्या

रतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर ‘एआयबी' शोचा कलाकार तन्मय भटने  केलेल्या अश्लाघ्य व्हिडीओविरोधात सर्वच स्तरातून टीका होत आहे. या वादावर आता दिग्गज पार्श्वगायिका आणि लतादीदींची धाकटी बहिण आशा भोसले यांनीही मौन सोडलं असून भटवर चांगल्याच कडाडल्या आहेत. 

‘मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही, तो पाहण्याची माझी इच्छाही नाही. मी फारसा टीव्ही पाहत नसल्यामुळे मला माझा नातू चिंटूने यासंदर्भात सांगितलं. आपण एखाद्या महिलेविषयी बोलतोय याचं भान त्याने बाळगायला हवं होती. या तपस्वीने वयाची ७० ते ८० वर्ष संगीतसाधनेत आणि जगभरात आनंद पसरवण्यात वेचली आहेत.’ अशा शब्दात तन्मयवर ताशेरे ओढले आहेत.

‘आता किती जण आम्हाला पाठिंबा देतात, हे मला पाहायचं आहे. प्रकरण ताजं असताना त्यावर चर्चा करायची अनेकांना सवय असते, मात्र काही काळाने सगळेच जण विसरुन जातात. आपल्या देशात भारतरत्नांचा किती आदर आहे, हे बघायचं आहे. सरकारने त्यांना हा सन्मान बहाल केला आहे. त्यामुळे त्यांनी याची दखल घ्यायलाच हवी’ असं त्या म्हणतात.

या वादावर भारतरत्न लता मंगेशकर यांनीही रोष व्यक्त केला असून, त्या म्हणाल्या की, ‘मी हा व्हिडीओ पाहिलेला नाही. मला याबाबत भाष्य करायचं नाही. तन्मय भट कोण आहे, हे मला माहित नाही.’

Web Title: Tanmay Bhatwar Asha Bhosale Kadadale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.