तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 09:35 IST2025-07-23T08:08:55+5:302025-07-23T09:35:39+5:30
Tanishq : डी बीयर्ससोबत भागीदारीत 'तनिष्क डायमंड्स एक्स्पर्टीज सेंटर' सुरू; प्रत्येक ग्राहकाला ज्ञान आणि विश्वासाची आगळीवेगळी भेट

तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
भारताचा सर्वात विश्वासार्ह दागिने ब्रेड असलेल्या तनिष्कने, डी बीयर्स ग्रुपसोबत भागीदारी करत पहिलेवहिले 'तनिष्क डायमंड्स एक्स्पर्टीज सेंटर' सुरू केले आहे. हा एक अनोखा उपक्रम असून, यात हिऱ्यांच्या खरेदीबद्दल प्रचलित असलेल्या जुन्या समजुतींना बदलून, विश्वास, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर हिरे खरेदीचा अनुभव नव्याने ग्राहकांना देण्यात येणार आहे. या नव्या चमकदार पर्वाची सुरुवात करण्यासाठी तनिष्कने एका शानदार कार्यक्रमाचं आयोजन केलं, ज्यात आजच्या आत्मनिर्भर आणि आपल्या निवडींबाबत ठाम असलेल्या तनिष्कच्या स्त्रियांचा सन्मान करण्यात आला.
हा एक असा अनोखा उपक्रम आहे, ज्यामुळे ग्राहकांची एक मोठी अडचण दूर झाली आहे. आता दुकानातच हिऱ्याची पारदर्शक तपासणी केली जाईल. या तपासणीत अत्याधुनिक मशीन वापरून, हिऱ्याची गुणवत्ता आणि तो कुठून आला आहे, हे तपासणं सोपं होईल. यामुळे ग्राहकांना लगेच खात्री पटेल आणि त्यांच्या मनातील शंका दूर होतील. हे मोठं पाऊल उचलून, तनिष्कने हिऱ्यांच्या पारदर्शक खरेदीमध्ये एक नवा बेंचमार्क सेट करत, दागिन्यांच्या क्षेत्रात आपले नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. यामुळे ग्राहकांना हिरा खरेदी करताना अधिक स्पष्टता, आत्मविश्वास मिळेल, तसेच मनातील काळजी देखील दूर होईल.
या 'तनिष्क डायमंड्स एक्स्पर्टीज सेंटर'मध्ये पाच खास मशीन आहेत. या मशीन हिऱ्याच्या अनेक गोष्टी तपासतात, जसे की त्याची चमक, तो कुठून आला, त्यात काही दोष आहेत का आणि त्यावर लेझर मार्किंग आहे का. ही सर्व तपासणी आता दुकानातच होत असल्याने, हिऱ्याबद्दलची सगळी माहिती थेट ग्राहकांच्या हातात आली आहे. आता केवळ विक्रेत्याच्या बोलण्यावर अवलंबून न राहता, ग्राहक स्वतः हिऱ्याच्या सुंदरतेमागे काय विज्ञान आहे, ते पाहू शकतील. यातील 'लाइटस्कोप' मशीन हिऱ्याची चमक किती चांगली आहे हे दाखवते. यामुळे ग्राहक सर्वात जास्त चमकणारा हिरा निवडू शकतील. तर 'सिंथडिटेक्ट' मशीन हिरा खरा नैसर्गिक आहे की नाही, हे अचूकपणे सांगते. यामुळे खरेदीदाराला पूर्णपणे खात्री मिळते. तनिष्कने या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासोबत जोडून हिऱ्याबद्दलची क्लिष्ट माहिती सोप्या आणि डोळ्यांना दिसणाऱ्या स्वरूपात दिली आहे. याचा अर्थ ग्राहकांना फक्त माहितीच नाही, तर हिरा निवडण्याचा खरा अधिकार मिळाला आहे.
या खास उपक्रमाच्या उद्घाटनासाठी तनिष्कने एक दिमाखदार कार्यक्रम आयोजित केला होता. यात तनिष्कच्या सर्वात खास कलेक्शनचे प्रदर्शन करण्यात आले, ज्यात अत्यंत दुर्मिळ नैसर्गिक हिऱ्यांपासून बनवलेले दागिने होते. यातील प्रत्येक डिझाईन एक खास कलाकृती असून, संपूर्ण जगात ती एकमेव दागिन होती. 'इथेरल वंडर्स' (Etheral Wonders) नावाचं कलेक्शन जुन्या परंपरा आणि आधुनिक डिझाईन्सच एक सुंदर संगम होतं. तर 'रेडियन्स इन रिदम' (Radiance In Rhythm) हे कलेक्शन कारागिरीचा एक उत्तम नमुना होतं, ज्यात हिऱ्यांची उत्तम गुणवत्ता, विचारपूर्वक केलेले डिझाईन्स आणि खास सेटिंग स्टाइल दिसून येत होती. हे कलेक्शन तर पॅरिस कॉउचर वीकसारख्या जागतिक व्यासपीठावरही लॉन्च करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन, तसेच फातिमा सना शेख आणि सपना पाब्बी यांनी हजेरी लावली. त्यांच्यासोबतच उद्योगातील मोठे नेते आणि हिऱ्यांची आवड असणारे अनेक जण उपस्थित होते, ज्यामुळे या चमचमत्या रात्रीत आणखी झगमगाटाची भर पडली. या खास सोहळ्याचा शेवट एका अप्रतिम फॅशन शोने झाला. या शोमध्ये तनिष्कच्या नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने रॅम्पवर चमकले. यातून तनिष्कच्या डिझाईन्समध्ये असलेली कला, त्यांची अचूकता आणि त्यामागील कथा स्पष्ट दिसत होती. हा शो तनिष्कच्या हिऱ्यांच्या प्रवासाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य दाखवत होता, म्हणजे डिझाइन, कारागिरी आणि ग्राहकांच्या विश्वासात तनिष्कने कशी प्रगती केली, हे यातून समजत होतं. हा कार्यक्रम फक्त सुंदर दागिन्यांचं प्रदर्शन नव्हता, तर हिरा खरेदीचा अनुभव बदलण्याच्या तनिष्कच्या प्रयत्नाचं तो एक प्रतीक होता. यात दाखवलेला प्रत्येक हिरा हा दुर्मिळता, चमक आणि चिरंतन सौंदर्य दर्शवत होता.
या प्रसंगी बोलताना, तनिष्क-टायटनचे सीईओ, अजय चावला म्हणाले की, "तनिष्क डायमंड्स एक्स्पर्टीज सेंटर सुरू करण्यामागे आमचा उद्देश, नैसर्गिक हिऱ्यांच्या विक्रीमध्ये एक नवीन आणि उच्च दर्जा तयार करणे आहे. आम्ही हिरे फक्त दाखवून विकू इच्छित नाही, तर ग्राहकांना हिरा खरेदीचा एक पारदर्शक, माहितीपूर्ण आणि खरोखरच आनंददायक अनुभव देऊ इच्छितो. ग्राहकांना हिऱ्याबद्दलची सगळी माहिती देऊन, आम्ही त्यांना त्यांच्या निवडलेल्या हिऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला समजून घेण्यास मदत करत आहोत. जसे की त्याची कारागिरी कशी आहे, तो किती चमकतो, तो कुठून आला आहे आणि तो खरा आहे की नाही, यांची माहिती त्यांना देतो. तनिष्कसाठी, ग्राहक हे प्रत्येक नव्या शोधाच्या केंद्रस्थानी असतात. त्यामुळे हा उपक्रम त्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मदतीने लगेच माहिती मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे."
त्याचबरोबर, डी बीयर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अमित प्रतिहारी यांनी म्हटले की, "एक नैसर्गिक हिरा निवडणे हा खूप खास आणि भावनिक अनुभव असतो. आज आम्ही दागिन्यांच्या विक्रीमध्ये एका मोठ्या बदलाची आणि एका परिवर्तनशील अध्यायाची सुरुवात करत आहोत. हा बदल नैसर्गिक हिऱ्यांच्या मुख्य गुणांसारखाच आहे, जसे हिरे खरे, दुर्मिळ आणि जबाबदार असतात. डि बीयर्स ग्रुप म्हणून, आम्ही तनिष्कच्या दुकानांना जागतिक दर्जाची हिऱ्यांची माहिती आणि कौशल्य देण्यासाठी कटिबद्ध आहोत. यामुळे भारतीय ग्राहकांना दुकानात उत्तम अनुभव मिळेल आणि प्रत्येक नैसर्गिक हिरा खरा असल्याची खात्री करून देताना ग्राहकाचा विश्वास आणि पारदर्शकता वाढेल."
..........................................
तनिष्कबद्दल...
'तनिष्क' हा टाटा ग्रुपचा भारतातील सर्वाधिक पसंती मिळवणारा दागिन्यांचा ब्रँड आहे. वीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून तनिष्क उत्तम कारागिरी, खास डिझाईन्स आणि उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी यासाठी ओळखला जातो. भारतीय स्त्रियांच्या पारंपरिक आणि आधुनिक इच्छा-आकांक्षा समजून घेऊन, त्यांना योग्य दागिने देणारा देशातील एकमेव दागिन्यांचा ब्रँड म्हणून तनिष्कने स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. त्यांना सर्वात शुद्ध दागिने देण्याचं वचन पूर्ण करण्यासाठी, तनिष्कच्या सर्व दुकानांमध्ये कॅरटमीटर आहे. यामुळे ग्राहक आपल्या सोन्याची शुद्धता सर्वात सोप्या पद्धतीने तपासू शकतात. सध्या तनिष्कची ५०० पेक्षा जास्त दुकाने, ३०० पेक्षा जास्त शहरांमध्ये आहेत.
डी बीयर्स ग्रुपबद्दल...
१८८८ मध्ये स्थापन झालेली 'डी बीयर्स ग्रुप' ही जगातील आघाडीची हिरे कंपनी आहे. हिरे शोधणे, खाणीतून काढणे, मार्केटिंग करणे आणि विकणे याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. डी बीयर्स ग्रुप आणि त्यांचे भागीदार मिळून हिऱ्यांच्या व्यवसायात २०,००० पेक्षा जास्त लोकांना रोजगार देतात. मूल्याच्या दृष्टीने डी बीयर्स ग्रुप ही जगातील सर्वात मोठी हिरे उत्पादक कंपनी आहे, ज्यांच्या हिऱ्यांच्या खाणी बोत्सवाना, कॅनडा, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेत आहेत. डी बीयर्स ग्रुपच्या धोरणात सातत्यपूर्ण नावीन्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ते हिरे व्यापाराच्या संपूर्ण साखळीत वेगवेगळ्या सेवा प्रदान करतात, ज्यात त्यांचे स्वतःचे दागिन्यांचे बँड, डि बीयर्स ज्वेलर्स आणि डि बीयर्स फॉरेव्हरमार्क यांचाही समावेश आहे. याशिवाय, 'ट्रॅकर' आणि 'जेमफेअर' यांसारख्या हिऱ्यांच्या मूळ आणि शोध घेण्याच्या नवीन पद्धतीही ते वापरतात. डी बीयर्स ग्रुप हिऱ्यांच्या उद्योगात 'डी बीयर्स इन्स्टिट्यूट ऑफ डायमंड्स'द्वारे शिक्षण आणि प्रयोगशाळा सेवा, तसेच 'डी बीयर्स ग्रुप इग्नाइट' द्वारे हिरे वर्गीकरण, ओळख आणि तपासणीची अनेक प्रकारची तंत्रज्ञान प्रणाली पुरवतो. डी बीयर्स ग्रुप 'बिल्डिंग फॉरेव्हर' या तत्त्वासाठी वचनबद्ध आहे. हा एक असा सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे, जो चांगले भविष्य घडवण्यासाठी आहे, ज्यात सुरक्षा, मानवाधिकार आणि नैतिक प्रामाणिकपणा नेहमीच महत्त्वाचे राहतील; जिथे समाजाची भरभराट करता येतील आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल, तसेच सर्वांसाठी समान संधी असतील. डि बीयर्स ग्रुप 'अँग्लो अमेरिकन पीएलसी' समूहाचा एक भाग आहे. अधिक माहितीसाठी, तुम्ही www.debeersgroup.com ला भेट देऊ शकता.
#AbHarDin HuaAasan