सिल्व्हेस्टरने केला होता आॅस्करवर बहिष्काराचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:21 IST2016-02-10T06:51:22+5:302016-02-10T12:21:22+5:30

अभिनेता सिल्व्हेस्टर स्टेलनने आॅस्कर पुरस्कार प्रदान सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

Sylvester thought of boycotting Oscar | सिल्व्हेस्टरने केला होता आॅस्करवर बहिष्काराचा विचार

सिल्व्हेस्टरने केला होता आॅस्करवर बहिष्काराचा विचार

स्कर पुरस्कारांमध्ये वांशिक विविधतेच्या वादामुळे अभिनेता सिल्व्हेस्टर स्टेलनने आॅस्कर पुरस्कार प्रदान सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आफ्रिकी- अमेरिकी दिग्दर्शक रेयन कुगलर यांना यापासून परावृत्त केले.

स्टेलन यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विभागात नामांकन मिळाले आहे. 28 फेब्रुवारी रोजी हा सोहळा होणार आहे. स्टेलन यांनी ‘क्रीड’चे दिग्दर्शक कुगलर यांना याविषयी सल्ला विचारला. यावर्षीच्या नामांकनामध्ये विविधता नसल्याची टीका होत आहे. काही अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक यांनी या समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

स्टेलन म्हणाले, नामांकनाबद्दल मी अतिशय नम्र आहे. पण आपण हा आनंद साजरा करू की नाही, याबद्दल नक्की काही सांगता येत नाही. मी कुगलर यांचा सल्ला घेतला. त्यांनी नाही म्हटले तर समारंभाला जाणार नाही. जा म्हटले तर जाणार, अशी माझी भूमिका होती. त्यांनी मला चित्रपटाच्या समर्थनासाठी समारंभाला जा, असे सांगितले आहे. त्यामुळे मी उपस्थित राहणार आहे. 

Web Title: Sylvester thought of boycotting Oscar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.