पोर्न स्टार एम्बरचा संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 13:33 IST2016-04-06T20:33:35+5:302016-04-06T13:33:35+5:30
‘बालिका वधू’ या प्रसिद्ध मालिकेतील आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जीच्या रहस्यमयी मृत्यूनंतर हॉलीवुड अॅडल्ट चित्रपटातील स्टार एम्बर रायन हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

पोर्न स्टार एम्बरचा संशयास्पद मृत्यू
‘ ालिका वधू’ या प्रसिद्ध मालिकेतील आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जीच्या रहस्यमयी मृत्यूनंतर हॉलीवुड अॅडल्ट चित्रपटातील स्टार एम्बर रायन हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुत्रानुसार एम्बरचा मृत्यदेह तिच्या लॉस एंजलिस येथील राहत्या घरात आढळून आला. एम्बर केवळ ३१ वर्षाची होती. एम्बरच्या कलिगने तिच्या मृत्यूचा आरोप पॉर्न स्टार जेम्स डीन याच्यावर केला आहे. तिचे म्हणणे आहे की, जेम्सने एम्बरला सेक्सयुली हॅरेसमेंट केले होते. दरम्यान एम्बरची डेड बॉडी शनिवारी रात्री तिच्या बेडवर आढळून आली. मात्र तिच्या मृत्यूचे अधिकृत कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही. पोलीस यासंपुर्ण प्रकरणाची चौकशी करीत आहेत. २०१५ मध्ये शुटिंगदरम्यान जेम्सने एम्बरच्या चेहºयावर मारहाण केल्याचा तिने एका मुलाखतीदरम्यान आरोप केला होता. तसेच जेम्सने २००६ मध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा देखील आरोप केला होता. जेम्सची एक्स गर्लफ्रेंड सोत्या जो पोर्न इंडस्ट्रीमध्येच असून, त्यावरूच एम्बर आणि जेम्समध्ये वाद झाल्याची चर्चा आहे.