सचिनच्या गुडघ्यावर झाली सर्जरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 20:05 IST2016-07-06T14:35:52+5:302016-07-06T20:05:52+5:30
बुधवारी (दि. ०६) सचिनच्या गुडघ्याचे लंडनमध्ये आॅपरेशन झाले.

सचिनच्या गुडघ्यावर झाली सर्जरी
म स्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला तरी जखमा आणि दुखण्याने त्याची पाठ अजुन सोडलेली नाही. बुधवारी (दि. ०६) सचिनच्या गुडघ्याचे लंडनमध्ये आॅपरेशन झाले. सर्जरीनंतर डॉक्टरांनी सचिनला आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
‘क्रिकेटच्या देवा’च्या तब्येतीची काळजी करणाऱ्या त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना आश्वस्त करत सचिनने स्वत: इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर त्याच्या जखमी पायाचा फोटो शेअर केला. यामध्ये त्याचा पायाला प्लॅस्टर दिसत आहे.
फोटोला कॅप्शन म्हणून त्याने लिहिले की, स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती घेऊनही इंजुरीज्कडे दुर्लक्ष करून चालत नाही. पण मी लवकरच यातून ठणठणीत बरा होईन, असा मला विश्वास आहे.
सचिन तुझ्या सर्व चाहत्यांप्रमाणेच आमचीसुद्धा तु लवकर बरा व्हावा अशी मनोमन इच्छा आहे.