सुरेश रैना बनला बाप!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 20:28 IST2016-05-15T14:49:48+5:302016-05-15T20:28:51+5:30
होय, क्रिकेटर सुरेश रैना बाप झालाय. आज रविवारी खुद्द रैनानेच ही गोड बातमी आपल्या चाहत्यांशी शेअर केली.
.jpg)
सुरेश रैना बनला बाप!!
होय, क्रिकेटर सुरेश रैना बाप झालाय. आज रविवारी खुद्द रैनानेच ही गोड बातमी आपल्या चाहत्यांशी शेअर केली. रैनाला कन्यारत्न झाले आहे. या चिमुकल्या परीचे ‘ग्रेसिया’ असे नामकरणही करण्यात आले आहे. आयपीएल सोडून रैना हॉलंडमध्ये पत्नी प्रियंकाकडे पोहोचला होता. कधी एकदा प्रियंका बाळाला जन्म देते, असे रैनाला झाले होते. अखेर त्याची प्रतीक्षा संपली. आयपीएलच्या ९ व्या सीझनमध्ये रैना गुजरात लायन्स टीमचा कॅप्टन आहे. रैना व प्रियंकाचे गतवर्षी ३ एप्रिलला लग्न झाले होते. प्रियंका हॉलंडमध्ये एका बँकेत नोकरी करते. सध्या रैना चिमुकल्या ग्रेसियात गुंग आहे...रैना, अभिनंदन!
Here she comes our beautiful angel Gracia Raina❤️❤️ pic.twitter.com/atGhywJu7B
— Suresh Raina (@ImRaina) 15 May 2016