सुराना अॅड कंपनीला ५० वर्षे पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:06 IST2016-01-16T01:18:39+5:302016-02-07T11:06:45+5:30
. सुराना अँड कंपनीला 50 वर्षे पूर्ण
सुराना अॅड कंपनीला ५० वर्षे पूर्ण
ुराना अँड कंपनीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरातील अनेक नामांकित मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून हजेरी लावली. टीमच्या प्रत्येक सदस्याने त्याचे लक्ष्य गाठण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिल्याचा उत्साह जाणवत होताच. सीए अनिल पारख व विजय कुमार सुराना यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षांव होत होता. लोकमत मीडिया एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा, राज्यसभा सदस्य अजय संचेती, अनिल रायसोनी, सीबीआयचे नागपूर प्रमुख संदीप तामगाडगे, समीर मेघे व सर्व मान्यवर पाहुणे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सीए जयदीप शाह व अजय संचेती यांनी संस्थापक सदस्यांना शुभेच्छा दिल्या. औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही वेळी काढलेल्या फर्म सदस्यांच्या फोटोंचे कोलाज सेल्फी बुथवर सजविण्यात आले होते. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत 50 अंक असलेला केकही यावेळी कापण्यात आला.