गुगलवर सनी लिओनी 'हीट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:21 IST2016-01-16T01:09:07+5:302016-02-09T11:21:46+5:30
लोकप्रिय सर्च इंजिन 'गुगल'ने २0१५ मध्ये सर्वाधिक शोधली गेलेली माहिती जाहीर केली आहे. त्यामध्ये भारत...

गुगलवर सनी लिओनी 'हीट'
ल कप्रिय सर्च इंजिन 'गुगल'ने २0१५ मध्ये सर्वाधिक शोधली गेलेली माहिती जाहीर केली आहे. त्यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक शोधलेल्या व्यक्तींमध्ये सनी लिओनीने सर्वांत वरचे स्थान पटकावले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहावे स्थान मिळाले आहे. भारतात सर्वाधिक शोधलेल्या पहिल्या दहा व्यक्तींमध्ये लिओनीनंतर सलमान खान, एपीजे अब्दुल कलाम, कॅटरिना कैफ, दीपिका पदुकोन, यो यो हनी सिंग, काजल अग्रवाल, आलिया भट्ट यांचा क्रमांक आहे. समाधानाची बाब ही की देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी सेलिब्रिटींनी खचाखच भरलेल्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. तर मोदींना 'टॉप १0'च्या यादीत सर्वांत शेवटचे स्थान मिळाले आहे.
मोदींना २0१४ मध्ये दुसरा क्रमांक मिळाला होता, तर लिओनी पहिल्याच क्रमांकावर होती. सलमानने आता दुसरे स्थान पटकावले आहे. हिट अँड रन प्रकरणामुळे सलमानविषयी देखील अनेकवेळा गुगलवर माहिती सर्च करण्यात आली आहे. बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो रे, दबंग अशा चित्रपटांमुळेही सलमानला वरचे स्थान मिळाले आहे. सनी लिओनीने मात्र या वर्षीही आपले स्थान कायम ठेवले आहे. यंदा एक पहेली लीलामधून सनीने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली होती. तसेच तिच्याविरोधात एका गृहिणीने तक्रार केली होती. तसेच कंडोमची जाहिरात केल्यानेही ती चर्चेत आली होती. त्यामुळे इंटरनेटवर सनीला अनेकांनी अनेकवेळा सर्च केल्याचे गुगलने म्हटले आहे. याशिवाय अन्य गटातील सर्वाधिक सर्च झालेल्या विषयांची यादीही 'गुगल'ने जाहीर केली आहे.