सनग्लासेस लावून फिरणारी मांजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 08:34 IST2016-02-12T15:34:26+5:302016-02-12T08:34:26+5:30
बॅगल सोशल मीडियावर सनग्लास कॅट नावाने प्रसिद्ध झाली आहे.

सनग्लासेस लावून फिरणारी मांजर
दोन महिन्यांची असताना बॅगलला तिने घरी आणले होते. तिला लहानपणापासूनच डोळ्यांचा आजार आहे. तिच्या डोळ्यात अश्रू निर्माण होत नाहीत. या आजारामुळे तिच्यावर आतापर्यंत तीन आॅपरेशन करण्यात आलेत. तसेच तिच्या डोळ्यात दररोज औषध टाकावे लागते. तिच्या डोळ्यांच्या संरक्षणासाठी कॅरेन तिला बाहेर नेताना सनग्लासेस लावते.
जेव्हा कधी कॅरेन तिच्या मांजराला घेऊन बाहेर जाते तेव्हा लोक उत्सुकतेने तिच्या डोळ्यावर लावलेल्या गॉगल्सबद्दल विचारतात. त्यावेळी कॅरेन त्यांना बॅगलच्या आजाराची माहिती देते. कॅलिफोर्नियामध्ये उत्सुक्ते पोटी अनेक लोक कॅरेनच्या घरी भेटी देत आहेत.
अनेकांनी त्या मांजरीचा आजार बरा होण्यास मदत देखील करण्याची तयारी दर्शवली मात्र ती कॅरेनने नाकरली. काही युवकांनी मंडळीनीं भेटी दरम्यान मांजरॅसोबत सेल्फी काढले आहेत. जणू आज ती कॅलिफोर्नियातील एक सेलेब्रिटी बनली आहे.