सुनैना मोहाल : एक प्रेरणादायी दीपस्तंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 06:55 PM2024-04-02T18:55:31+5:302024-04-02T18:56:38+5:30

सुनैना शारीरिक सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य जपण्यात आणि वाढवण्यात विश्वास ठेवतात.

Sunaina Mohal : An inspirational beacon lady of aurangabad in fashion world | सुनैना मोहाल : एक प्रेरणादायी दीपस्तंभ

सुनैना मोहाल : एक प्रेरणादायी दीपस्तंभ

महाराष्ट्रातील औरंगाबाद ही जन्मभूमी असलेली एक निरागस मुलगी, पुढे अमेरिकेत जाते, तिथे स्वतःच वर्चस्व स्थापित करते, आपली एक ओळख बनवते, मिसेस इंडिया वर्ल्डवाईड ची फायनलिस्ट होते आणि तिच्या प्रवासातून इतरांना प्रेरणा देण्याचं एक उल्लेखनीय काम हाती घेते. हे वाचूनच किती इन्स्पायरिंग वाटत आहे. आयुष्याच्या टॅपेस्ट्री मध्ये अशी अनेक लोक भेटतात जी प्रत्येक क्षणाला एक ऊर्जा देत असतात, असंच एक नाव म्हणजे "सुनैना मोहाल". एका सामान्य घरातील मुलगी ते मिसेस इंडिया ची फायनलिस्ट हा त्यांचा प्रवास खरोखरच सर्वांसाठी एक आशेचा किरण दाखवणारा आहे. 

सुनैना शारीरिक सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य जपण्यात आणि वाढवण्यात विश्वास ठेवतात. त्यांच्या मते चांगले विचार हे एखाद्या जादूच्या छडी प्रमाणे असतात ते ज्याला कुणाला स्पर्श करतील त्याच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळते. तसेच काहीसं त्यांच्या बाबतीत हि घडलं. ज्या गोष्टी अगदी सध्या वाटतात त्या सुद्धा अगणित आनंद देऊन जातात. जसं कि सूर्योदय बघताना वाचत असलेलं एक सुंदर पुस्तक. किंवा आरश्यात स्वतःला निहाळतांना कानाच्या मागे नेलेली एक छोटीशी बट. अर्थात काय स्वतःवर प्रेम केलं की जग सुंदर वाटायला लागतं आणि तिथेच सुरु होत स्वतःवरचा दृढ आत्मविस्वास. 

सुनैना आपल्या प्रवासाबबद्दल सांगताना म्हणतात ,"एका चमत्कारिक क्षणापासून सुरुवात होते ती म्हणजे स्वतःमधल्या पोटेन्शियल ला समजून घेऊन आपल्या स्वप्नांसाठी जगण्याची. अर्थात तिथे पोहोचणे सोपे नाही हे माहित असून सुद्धा आपण त्या प्रवासाला निघण्याची तयारी करतो आणि सोबत घेतो ते म्हणजे खूप सारी सकारात्मकता आणि आव्हान झेलण्याची तयारी." 

सुनैना त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ दोन्ही अप्रतिम रित्या बॅलन्स करून त्यांच्या विश्वसुंदरी होण्याच्या स्वप्नांसाठी पॅशनेटली काम करत आहेत. त्यांच्या हेल्थ आणि वेलनेस रुटीन मध्ये कुठल्याही क्षणिक मोहामुळे त्या खंड पडू देत नाहीत. नियमित व्यायाम, योग्य डाएट आणि भरपूर योगा व मेडिटेशन हि त्यांच्या लाइफस्टाइल ची चतुःसूत्री आहे. त्यांच्या मते प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला प्राधान्य हे द्यायलाच हवे. आपण निरोगी असलो तर आपले घर, आपले करियर आणि आपली स्वप्ने तिघांना हि न्याय देता येतो. 

सुनैना यांच्या पुढील प्रवासात त्यांना भरभरून यश मिळेलच याची सर्वाना खात्री आहेच परंतु त्यांच्या कडे बघून अजून असंख्य मुली स्वतःसाठी,, स्वतःच्या स्वप्नांसाठी प्रवासाला निघतील याची देखील खात्री वाटते .

Web Title: Sunaina Mohal : An inspirational beacon lady of aurangabad in fashion world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.