यशस्वी लोकांच्या लाभदायक सवयीे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 23:28 IST2016-04-29T17:58:50+5:302016-04-29T23:28:50+5:30
काही सवयी यशस्वी लोक स्वत:ला लावून घेतात

यशस्वी लोकांच्या लाभदायक सवयीे
आ परा विनफ्रे, मार्क झुकेरबर्ग अशी नाव ऐकली की मनात विचार येतो, ही माणसं असे काय करत असतील ज्यामुळे ते एवढी यशस्वी झाले आहेत. म्हणतात ना की, यशस्वी लोक वेगळं काही करत नाहीत. ती केवळ रोजच्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. तसेच काही सवयी त्यांनी स्वत:ला लावून घेतलेल्या असतात ज्यामुळे ते ध्येयावर शंभर टक्के फोकस करू शकतात.
काय आहेत त्या सवयी?
1. ध्यानधारणा (मेडिटेशन) : रोज सकाळी उठल्यावर शांत एका ठिकाणी बसून मेडिटेशन केल्यामुळे आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. आॅपरा विनफ्रे, जॅक डोर्सी रोज मेडिटेशन करतात.
2. सकाळी लवकर उठणे : जगातील जवळपास सर्वच यशस्वी लोक सकाळी लवकर उठतात. रिचर्ड ब्रॅन्सन सारखा श्रीमंत व्यक्तीदेखील सकाळी 5.45 वा. उठतो.
3. खर्च कमी : अब्जाधीश असले म्हणून ते पैशाची उधळपट्टी करत नाहीत. मेहनतीने कमावलेल्या पाई पाईची त्यांना किंमत असते. साधी राहणी, उच्च विचार उगीच नाही म्हणत.
4. दानशूरपणा : आपण कमावलेल्या संपत्तीचा एका मोठा वाटा समाजातील गरजवंतांना देण्याची यशस्वी लोकांमध्ये वृत्ती असते. वॅरेन बुफेट, बिल गेट्स, झुकेरबर्ग यांनी तर अर्ध्याच्या वर संपत्ती दान केली आहे.