लग्न करणाऱ्या नववधूंसाठी स्टायलिंग गाइड...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 18:27 IST2016-12-06T18:27:00+5:302016-12-06T18:27:00+5:30
लेटेस्ट ब्राइडल फॅशनच्या बाबतीत माहिती हवीय मात्र जवळपास आपणास कुणी सांगणारे पण नाही, ज्याच्याकडून स्टायलिंग टिप्स आणि इन्स्पिरेशन मिळेल. गुगलवर देखील लेटेस्ट ब्राइड फॅशन सर्च केल्यानंतर वेगवेगळ्या लिंक्सवर वेगवेगळी माहिती मिळते, आणि ती माहिती फक्त कन्फ्यूज करते.

लग्न करणाऱ्या नववधूंसाठी स्टायलिंग गाइड...!
लेटेस्ट ब्राइडल फॅशनच्या बाबतीत माहिती हवीय मात्र जवळपास आपणास कुणी सांगणारे पण नाही, ज्याच्याकडून स्टायलिंग टिप्स आणि इन्स्पिरेशन मिळेल. गुगलवर देखील लेटेस्ट ब्राइड फॅशन सर्च केल्यानंतर वेगवेगळ्या लिंक्सवर वेगवेगळी माहिती मिळते, आणि ती माहिती फक्त कन्फ्यूज करते. जर आपणही यावर्षी लग्न करीत असाल आणि ही समस्या आपणास भेडसावत असेल तर आजच्या सदरात नववधूंसाठी काय फॅशन टिप्स आहेत, याबाबत जाणून घेऊया...
यात काही निवडक आउटफिट्स आणि ज्वेलरीच्या बाबतीत माहिती दिली आहे, आणि या टिप्स फॉलो करुन नक्कीच आपण इतरांपेक्षा वेगळे दिसाल.
लाल पेक्षा पेस्टल शेड ट्राय करा
बहुतांश नववधू लग्नाप्रसंगीचा जोडा हा लाल रंगाचाच वापरतात. मात्र यावेळी डिजीटल प्रिंट्स किंवा पेस्टल शेडचा घागरा आणि त्यासोबतच स्टायलिश चोळी परिधान करु शकता. सिल्क फेब्रिकचे घागरेदेखील आपल्या लूकला याप्रसंगी वेगळेपण देईल.
जाड घागऱ्याऐवजी ट्राय करा अनारकली गाऊन्स
डिझाईन शिवाय जरीचे आणि मिरर वर्क केलेले गाऊन्स खूपच ट्रेंडी वाटतील. घागºयामध्ये आपणास ट्रॅडिशनल लूक मिळतो, मात्र तेच गाऊन्स मॉडर्न ब्राइड्सला सूट करतील. विशेष म्हणजे लग्नाशिवाय एंगेजमेंट आणि रिसेप्शनमध्येही परिधान केला जाऊ शकतो.
जुन्या साडीला सिल्क दुपट्टा आणि एम्ब्रॉयडरीने करा स्टायलिश
याप्रसंगी आपण जुन्या साड्यांनादेखील हटके लूक देऊन परफेक्ट बनवू शकता. गोटा पट्टी आणि स्टोनच्या साड्यांमध्ये थोडे-फार बदल करून त्यांना डिझायनर लूक देता येऊ शकतो. शिवाय एम्ब्रॉयडरी आणि लेस वर्कदेखील ट्राय करु शकता.
वेलवेट आउटफिटने द्या हटके लूक
काहीसा हटके आणि यूनिक एक्सपेरिमेंट्स हवा असेल तर वेलवेटचा वापर करु शकता. यामुळे आपल्याला लग्नप्रसंगी रॉयल लूक तर मिळेलच शिवाय आपण ग्लॅमरसदेखील अनुभवाल.
वेगवेगळ्या व्हरायटीच्या टॅम्पल ज्वेलरींना करा ट्राय
विशेषत: साउथ इंडियन्सना या प्रकारच्या ज्वेलरी परिधान केलेले पाहिले जाते. मात्र आता प्रत्येक नववधू या ज्वेलरीने स्वत:ला स्टायलिश बनवत आहे. यात पिकॉक डिझाइन्स, ग्रीन आणि मरुन कुंदन तसेच पर्ल सारख्या कित्येक व्हरायटीच उपलब्ध आहेत.