ओढणीने बना स्टायलिश !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 15:46 IST2016-12-14T15:46:54+5:302016-12-14T15:46:54+5:30

आज प्रत्येक महिलेला आपण सुंदर, आकर्षक व स्टायलिश दिसावे असे वाटते. त्यासाठी बहुतेकजण महागडे कपडे खरेदी करतात, पण हे प्रत्येकाच्या आवाक्यात नसते. मात्र स्टायलिश दिसण्यासाठी आपण ओढणीचा वापर करु शकता, जे सर्वांना शक्य आहे.

Stylish make up! | ओढणीने बना स्टायलिश !

ओढणीने बना स्टायलिश !

प्रत्येक महिलेला आपण सुंदर, आकर्षक व स्टायलिश दिसावे असे वाटते. त्यासाठी बहुतेकजण महागडे कपडे खरेदी करतात, पण हे प्रत्येकाच्या आवाक्यात नसते. मात्र स्टायलिश दिसण्यासाठी आपण ओढणीचा वापर करु शकता, जे सर्वांना शक्य आहे. ओढणीला वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन तुम्हाला एक आकर्षक लूक मिळवता येऊ शकतो. ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा नक्कीच वेगळे आणि हटके दिसू शकता.

* आकर्षक रुप मिळविण्यासाठी ओढणीला आपल्या डोक्याभोवती गुंडाळा. वाटले तर डोक्यावर आभूषण पण घालू शकता. 

* पारंपारिक रुपापेक्षा आधुनिकतेचा लूक देऊ इच्छित असाल तर, हातावर ओढणी घेण्याऐवजी ती हाताला बांधून तिला अ‍ॅक्सेसरीच्या स्वरुपात वापरा. 

* कॅज्युअल लूक प्रभावी वाटण्यासाठी ओढणी गळ्यात अडकवण्यापेक्षा तुम्ही तिला दोन्ही बाजूने खांद्यावरुन समोर सोडू शकता. 

* कार्यक्रमात आकर्षक दिसण्यासाठी कॅज्युअल कपड्यासोबत ओढणी गळ्याभोवती गुंडाळून जा

Web Title: Stylish make up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.