स्टायलीश जीन्सची क्रेझ वाढतेय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 20:19 IST2016-06-12T14:42:57+5:302016-06-12T20:19:57+5:30
प्रत्येकाला वाटते की, आपण इतरांपेक्षा वेगळे दिसावे, त्यासाठी जो तो आपले व्यक्तिमत्त्व विविधरंगी पेहरावातून अधिक खुलविण्याचा प्रयत्न करीत असतो.
.jpg)
स्टायलीश जीन्सची क्रेझ वाढतेय...
डेनिम, डेनिझेन, डिझेल, फ्लार्इंग
आज बााजारात डेनिम, डेनिझेन, डिझेल, फ्लाइंग, क्लुंगे, ली, लेविस, न्युमेरो युनो, स्पायकर, रॅँगलर आदी प्रकारच्या जीन्सची मोठी चलती आहे. जीन्सच्या परिधानाने व्यक्तिमत्त्वात आकर्षकता येत असल्याने तरुणांना हा पर्याय अधिक आवडतो. तसेच जीन्समध्ये अधिक धूळ, डाग सहन करण्याचे गुणधर्म असतात. ओव्हर फेडेड, स्लिम फिट, पेन्सिल बॉटम अशा नानाविध प्रकारांमध्ये जीन्स बदलांना स्वीकारून बाजारात दिवसेंदिवस लोकप्रियतेचे शिखर गाठताना दिसत आहे.
प्रत्येक ऋतूत वापर शक्य
सध्याच्या आधुनिक युगात तरुण-तरुणींपासून ते आॅफिसल्या जाणाºया महिलांवर्गात फॅशनेबल जीन्सची जादू पाहायला मिळते. विशेष म्हणजे, प्रत्येक ऋतूत जीन्सचा वापर केला जाऊ शकतो. जीन्समुळे नक्कीच व्यक्तिमत्त्व खुलत असते. जीन्स वापरायला प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आवडते. विशेष म्हणजे, जीन्स टी-शर्टवर आकर्षक दिसते.
वाजवी किमतीत उपलब्ध
जीन्सच्या किमतीचा विचार जर केला तर बाजारात २५० रुपयांपासून तर ५,००० रुपयांपर्यंत जीन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतेक सर्व वर्गातील ग्राहक जीन्सची खरेदी करू शकतो. बदलत्या काळानुसार जीन्समध्येही आता बरेच बदल झालेले दिसतात.
तरुणांना देते नवा लूक
जीन्ससोबत तरुणांनी शर्ट, टीशर्ट, शॉर्ट शर्ट, कुर्ता तर तरुणांना टॉप, शर्ट, टीशर्ट, शॉर्ट शर्ट, शॉर्ट कुर्ता परिधान केल्याने प्रत्येक वेळी त्यांना नवा लूक मिळतो. यात हॉट पॅन्ट्स, थ्री फोर्थ, शॉर्ट पॅन्ट्स, स्कर्ट्सही उपलब्ध आहेत. यामुळे तरुणांच्या शब्दांमध्ये, येणारा फंकी, ट्रेंडी लूकही तरुणाईच्या पसंतीस पडत आहे. सध्या बाजारात स्ट्रेट कट, स्किनीज, लाईट बेलबॉटम असे प्रकार उपलब्ध आहेत.
स्किनीजची चलती
हल्ली तरुणींमध्ये स्किनीजची चलती आहे. कमरेपासून ते अगदी पायाच्या घोटापर्यंत घट्ट असा हा जीन्सचा प्रकार सध्या तरुणींच्या मनावर राज्य करीत आहे. ही जीन्स दिसायला आकर्षक असते. परंतु शरीरयष्टी जर जाड असेल तर हा पर्याय स्वीकारार्ह आहे का याविषयी अजूनही अनेक तरुणींमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात. बाजारात हाय वेस्ट, मिड वेस्ट आणि लो वेस्ट असे तीन प्रकार उपलब्ध आहेत. पोट सपाट असलेल्या व्यक्ती लो वेस्ट किंवा हाय वेस्ट जीन्स परिधान करताना दिसतात. या जीन्समध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसते.