​‘स्ट्रीप टी-शर्ट’ फॅशनची वाढती क्रेझ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 17:08 IST2016-12-13T17:08:23+5:302016-12-13T17:08:23+5:30

कित्येक तरुणांना स्ट्रीपचे म्हणजे रेषांचे टी-शर्ट, पॅन्ट आणि शर्ट परिधान करणे खूपच आवडते. त्यानुसार वाढत्या मागणीनुसार आज मार्केटमध्ये विविध डिझाईनचे स्ट्रीपचे टी-शर्ट उपलब्ध असून.....

'Strip T-shirt' fashion growing craze! | ​‘स्ट्रीप टी-शर्ट’ फॅशनची वाढती क्रेझ !

​‘स्ट्रीप टी-शर्ट’ फॅशनची वाढती क्रेझ !

ong>-Ravindra More

कित्येक तरुणांना स्ट्रीपचे म्हणजे रेषांचे टी-शर्ट, पॅन्ट आणि शर्ट परिधान करणे खूपच आवडते. त्यानुसार वाढत्या मागणीनुसार आज मार्केटमध्ये विविध डिझाईनचे स्ट्रीपचे टी-शर्ट उपलब्ध असून, बॉलिवूडच्या स्टार्सनादेखील याप्रकारचे टी-शर्ट परिधान करण्याचा मोह आवरला जात नाही. आज बरेच बॉलिवूड स्टार्स याप्रकारचे टी-शर्ट शूटिंग दरम्यानचा फावला वेळ किंवा बाहेर फिरत असताना वापर करीत असतात. 

स्ट्रीपचे टी-शर्ट दिसायला थोडे हटकेच असते आणि जर हे रंग बिरंगी असेल तर जरा जास्तच सुंदर वाटते. रेषांचे टी-शर्ट परिधान करण्यासाठी बरेच नियम आहेत, ज्यांना फॉलो करणे आवश्यक आहे. 

* बरेचजण रेषांचे टी-शर्ट मोठ्या आवडीने काही दिवस परिधान करतात. कारण हे टी-शर्ट परिधान केल्यानंतर आपल्याला एक वेगळेपण फिल होते शिवाय कंफर्टेबल पण वाटते. म्हणून काही दिवस सतत वापरायला काही हरकत नाही. विशेषत: आपण जेव्हा एखाद्या औपचारिक कार्यालयात किंवा कॉर्पोरेट जगतात काम करीत असाल तर स्ट्रीप टी-शर्ट मोठ्या आवडीने परिधान करु शकता. 

* स्ट्रीपच्या टी-शर्टने आपण फॅशनेबल तर वाटूच शिवाय रेषांच्या पॅन्टनेही आपण आपला लूक हटके बनवू शकता. जर रेषांची पॅन्ट परिधान करायची आहे तर त्यावरील सूटसोबत रंगीत जॅकेट वापरु शकता ज्यामुळे आपल्याला आकर्षक लूक मिळेल. जर आपण कोट किंवा जॅकेट वापरत नसाल तर दाट रेषांऐवजी बारीक रेषांची पॅन्ट आपण वापरु शकता. 

* मिश्रित रेषांचे कपडे नको
जरी स्ट्रीप टी-शर्टची फॅशन आहे, मात्र याचा असा अर्थ नाही की आपण प्रत्येक प्रकारच्या रेषांचे कपडे वापराल. दोन प्रकारचे मिश्रित लांब आणि तिरकस रेषांचे कपडे अजिबात परिधान करु नका. तिरकस रेषांचे टी-शर्ट आणि लांब रेषांची पॅन्ट असे मिश्रण पॅटर्न परिधान केल्यास आपण नक्कीच जोकर सारखे वाटणार. 

* बहुतांश स्ट्रीप टी-शर्ट लांब आणि उभ्या रेषांचे असतात. जर आपण आॅफिसात फॉर्मल आणि औपचारिक कपडे परिधान करु इच्छिता तर लांब रेषांनाच पसंती द्या. कारण लांब आणि उभ्या रेषांच्या टी-शर्टमध्ये आपली उंचीही चांगली वाटेल आणि व्यक्तिमत्त्वदेखील आकर्षक वाटेल. मात्र जर आपण थोडे स्थूल आणि हेल्दी असाल तर तिरकस रेषांचे टी-शर्ट वापरा, यामुळे नक्कीच आपले व्यक्तित्त्वाला हटके लूक मिळेल. 

* औपचारिक कपड्यात रेषांचे पॅटर्न नुसते आॅफिसातच नव्हे तर पार्टीत आणि प्रवासातही आपण वापरू शकता. याप्रसंगी असे टी-शर्ट आपणास नुसते आरामदायकच नव्हे तर फॅशनेबल लूकदेखील देईल. आपण चौकोनी आणि तिरकस रेषांचे टी-शर्ट विकेंडला परिधान करु शकता, जे आपणास औपचारिकपेक्षा वेगळा आणि बोल्ड लूक देईल. 

Web Title: 'Strip T-shirt' fashion growing craze!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.