कपड्यांवर डाग पडलाय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 16:14 IST2017-01-12T16:14:46+5:302017-01-12T16:14:46+5:30
बऱ्याचदा कळत-नकळत आपल्या कपड्यांवर तेल, शाई, चहा, कॉफी किंवा गंजल्याचे डाग पडतात. यामुळे आपले कपडे पूर्णपणे खराब होतात. ज्यांच्या खिशात पेन असतो, त्यांना तर शाईचा डाग पडणे ही समस्या नेहमीचीच असते.

कपड्यांवर डाग पडलाय?
ब ्याचदा कळत-नकळत आपल्या कपड्यांवर तेल, शाई, चहा, कॉफी किंवा गंजल्याचे डाग पडतात. यामुळे आपले कपडे पूर्णपणे खराब होतात. ज्यांच्या खिशात पेन असतो, त्यांना तर शाईचा डाग पडणे ही समस्या नेहमीचीच असते. शाईचे डाग खूप जिद्दी असतात. ते लवकर निघत नाही. मात्र खालील टिप्सच्या आधारे आपण सहज शाईचे डाग काढू शकतो.
* टूथपेस्ट - ज्याठिकाणी शाईचा डाग पडला असेल त्याठिकाणी विना जेलचे टूथपेस्ट लावा. सुकल्यानंतर कोणत्याही डिटर्जंट पावडरने धुवा.
* नेलपेंट रिमूव्हर - कापसाचा तुकडा नेलपेंट रिमूव्हरमध्ये बुडवून तो तुकडा डाग पडल्याच्या ठिकाणी घासा. यानंतर सामान्य पद्धतीने कपडा धुवा.
* मीठ - शाई ओली असेल तर त्यावर मीठ लावा. नंतर ओला टिशू व ब्रशच्या सहाय्याने धुवून घ्या.
* दूध - ज्या कपड्यांवर शाईचा डाग पडला आहे, ते कपडे रात्रभर दुधामध्ये बुडवून ठेवा. सकाळी डिटर्जंटने साफ करा.
* कॉर्नस्टार्च - कॉर्नस्टार्चला थोड्याशा दुधात मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट कपड्यावरील डागावर लावा. थोड्या वेळानंतर ब्रशने स्वच्छ करा.