​बेकहॅमचा पत्नीसाठी ‘स्पेशल’ बर्थडे मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 17:45 IST2016-04-19T12:15:03+5:302016-04-19T17:45:03+5:30

महत्त्वकांक्षी आणि अतिशय सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

'Special' birthday message for Beckham's wife | ​बेकहॅमचा पत्नीसाठी ‘स्पेशल’ बर्थडे मेसेज

​बेकहॅमचा पत्नीसाठी ‘स्पेशल’ बर्थडे मेसेज

रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि त्याची पत्नी व्हिक्टोरिया म्हणजे सुपरहॉट कपल. व्हिक्टोरियाच्या 42 व्या वाढदिवसाबद्दल संपूर्ण बेकहॅम कुटुंब उत्साहित आहे.

पती डेव्हिडने यावेळी व्हिक्टोरियाला दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, महत्त्वकांक्षी आणि अतिशय सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझा हा स्पेशल दिवस एकदम आनंदात जावो. मी आणि आपली मुले तुला आज प्रेमाने लाडावून टाक णार आहोत.

पुढे तो म्हणतो, या 42 वर्षांत तु जे यश मिळवले आहे ते खरोखरच प्रशंसणीय आणि प्रेरणादायी आहे. तुझी ऊर्जा आणि उत्साह पाहून मात्र असे वाटते की, आता कुठे तरी तु सुरुवात केली आहे. तुझ्या यशस्वी आयुष्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा.

आता लाडक्या पतीने एवढे तोंडभरून कौतुक केले म्हटल्यावर व्हिक्टोरियानेदेखील एक संदेश लिहिला. ती म्हणते, आज माझा वाढदिवस आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबासमवेत आजचा दिवस साजरा करताना माझा आनंद गगनात मावेनासा झालाय. धन्यवाद!

Web Title: 'Special' birthday message for Beckham's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.