​सोशल मीडिया मार्केटिंगचा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 09:30 IST2016-03-05T16:30:55+5:302016-03-05T09:30:55+5:30

भारतामध्ये आगामी काळात सोशल मीडिया मार्केटिंगचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढलेले असेल, असे भाकित  अपुर्व चामरियानी केले.

Social Media Marketing Fund | ​सोशल मीडिया मार्केटिंगचा फंडा

​सोशल मीडिया मार्केटिंगचा फंडा

सबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स दैनंदिन जीवनाच्या अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. त्याचा वापर व्यापार-व्यावसायवृद्धीसाठी करण्यासाठी होऊ शकतो हा विचार देखील काही वर्षांपूर्वी करणे अशक्य होते.

मात्र, मोठमोठ्या कंपन्या आता सोशल मीडिया मार्केटिंगवर विशेष भर देताना दिसतात.

याविषयी अपुर्व चामरिया यांनी ‘यू आर द की - अनलॉक डूअर्स थ्रू सोशल सेलिंग’ हे पुस्तक लिहिले आहे. भारतामध्ये आगामी काळात सोशल मीडिया मार्केटिंगचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढलेले असेल, असे भाकित त्यांनी केले. एका खाजगी तंत्रज्ञान कंपनीचे ते डिजिटल मार्केटिंग प्रमुख आहेत.

अपुर्व म्हणाले की, सेल्स आणि मार्केटिंगमध्ये खूप फरक आहे. आजही सेल्स प्रोफेशनल्सना जुन्या पारंपरिक पद्धतीचे प्रशिक्षणे दिले जातेय. त्यामुळे त्यांच्या कडून चांगल्या परिणामांची अपेक्षा करणे चुकीचे आहे. काळसुसंगत अशी वैयक्तिक मार्केटिंगची आता गरज आहे. त्यासाठी सोशल मीडिया हे फार प्रभावी माध्यम ठरते.

Apoorva

आयबीएम, टीसीएस, विप्रो, आॅरॅकल यांसारख्या आटी कंपन्या सोशल मीडियाचा मार्केटिंगसाठी खुबीने वापर करतात. संपूर्ण जनसमुहापर्यंत जाण्याऐवजी आपल्या टार्गेट आॅडियन्सपाशी वैैयक्तीकरित्या पोहचणे आजच्या काळात गरजेचे आहे.

प्रत्येकाच्या गरजचा ओळखून त्याप्रमाणे पर्सनलाईज्ड मार्केटिंग केली तर बाजारपेठेत टिकून राहणे शक्य असेल, असेही ते सांगण्यास विसरले नाही.

You Are the key

Web Title: Social Media Marketing Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.